सुमित सोनावणे, प्रतिनिधी
दौंड, 06 जानेवारी : राज्य शासनाकडून 'पाणी आडवा, पाणी जिरवा', ओढे, नाले खोलीकरण करण्यासाठी लाखो रुपये निधी खर्च करून पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, जलसंधारणासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड (Dound) शहरामधील एस.आर पेट्रोल पंपा समोरील दोन ओढ्यांवर अतिक्रमण करून सपाटीकरण केले जात आहे. धनदांडग्यांनी ओढ्याच्या एका बाजूला दुकाने उभी केली आहे तर दुसऱ्या बाजूला जमीन सपाटीकरणाच्या नावावर ओढे, नाले गिळंकृत करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
दौंड-पाटस रस्त्याच्या कडेला एस.आर पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या दोन जुन्या काळापासून नैसर्गिक ओढे आहेत. ओढ्याच्या कडेला काही अंतरावर धनदांडग्यांच्या जमिनी आहेत. त्यांच्या जमिनींचे क्षेत्र वाढविण्यासाठी चक्क ओढेच गिळंकृत करायला निघालेले आहेत आणि सगळा प्रकार भरदिवसा सुरू आहे. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे नैसर्गिक स्रोत असलेले ओढेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
माझं सेक्शुअल लाइफ समाधानी आहे तरी मी हस्तमैथुन करतो, हे चुकीचं आहे का?'
दौंड-पाटस रस्त्याच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले असल्याने गुंठेवारी करून पैसे कमविणे त्यासाठी काही करायला लागले आहेत. त्यामुळे नैसर्गिक स्रोत असलेले ओढेच गिळंकृत केले जात आहे.
जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांची कमाल! हळद, कडूनिंबपासून बनवले Sanitary pads
सध्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे स्थानिक ओढे, नाले, नदीचे लचके तोडून अतिक्रमण करून जमिनीचे क्षेत्र वाढविले जात आहेत. एकीकडे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कमी केल्यामुळे नागरी वस्तीत पाणी घुसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद झाले आहे अशा मध्ये दौंड मध्ये देखील धनदांडग्यांचा प्रकार समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.