हैदराबाद, 06 जानेवारी : सॅनिटरी नॅपकिन्सच्या (Sanitary Napkins) कचऱ्याचा प्रश्न देशभर गंभीर बनला आहे. कारण त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची यंत्रणा फारच थोड्या ठिकाणी आहे. ही समस्या लक्षात घेऊन तेलंगणा (Telangana) राज्यातल्या यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी ‘झीरो वेस्ट सॅनिटरी नॅपकिन्स’ (Zero Waste) तयार केले आहेत. स्त्री-रक्षा पॅड्स (Stree Raksha Pads) असं नाव त्यांना देण्यात आलं आहे. मुल्कलापल्ली इथल्या जिल्हा परिषद हायस्कूलमधल्या (ZP Highschool) विद्यार्थ्यांनी मेथी, सब्जाच्या बिया, जलपर्णी, हळद आणि कडूनिंब या घटकांचा वापर करून ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स (Organic sanitary pad) तयार केले आहेत. सध्या वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड्सचा शरीरावर साइड इफेक्ट (Side Effect) होऊ शकतो आणि पर्यावरणावरही विपरित परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर स्त्री रक्षा पॅड्स फायदेशीर आहेत.
एएनआयला माहिती देताना एका विद्यार्थ्याने सांगितलं, “बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या पॅड्सचे विघटन (Decompose) सहज होत नाही. ही समस्या लक्षात घेऊन सेंद्रिय, विघटनशील घटकांपासून आम्ही सॅनिटरी पॅड्स विकसित केली आहेत” हे वाचा - आता कोरोना विषाणूला मारा एक क्लिकवर; 16 वर्षांच्या मुलाने शोधली भन्नाट आयडिया! हे पॅड्स कसे तयार करण्यात आले, याची माहितीही एका विद्यार्थ्याने एएनआयला दिली. “जलपर्णी, कडूनिंबाची पानं, मेथी, हळद यांचं एकत्रित मिश्रण करून ती पेस्ट सुकवण्यात आली. त्यापासून घट्ट बोर्ड तयार झाला. हा बोर्ड सॅनिटरी पॅड्सच्या आकारात कापण्यात आला. त्यावर मेथी आणि सब्जाच्या बिया ठेवून मधमाश्यांच्या पोळ्यातल्या मेणाच्या साह्याने चिकटवण्यात आल्या. त्यानंतर हे बोर्ड कापसाच्या पट्ट्यांमध्ये ठेवून सील करण्यात आले”, असं त्यानं सांगितलं. कल्याणी नावाच्या शिक्षिकेने या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्या, “बाजारातील सॅनिटरी पॅड्स अनेक मुलींना उपलब्ध नसतात. त्यांचे अनेक दुष्परिणाम असतात आणि निसर्गात त्यांचं सहज विघटनही होत नाही. या समस्येवर विद्यार्थ्यांनी स्वतःच उपाय शोधला आणि त्याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे” हे वाचा - भारीच! स्मार्टकार्डची गरज नाही; फक्त रिकामी कॅन टाकून मशीनमधून मिळतात पैसे मासिक पाळी आणि ऑरगॅनिक पॅड्स वापरण्याचे फायदे आदींबद्दल जनजागृती करण्यासाठी आम्हाला छोटी तरी भूमिका निभावायची होती. ते आम्ही या उपक्रमातून साध्य केलं, असं या प्रकल्पात सहभागी झालेल्या मुलींनी सांगितलं.

)







