प्रश्न : मी माझ्या वैवाहिक आणि लैंगिक जीवनात समाधानी आहे. असं असलं तरी मी हस्तमैथुन रोखू शकत नाही. हस्तमैथुन करताना मी माझ्या महिला सहकाऱ्यास कल्पनेत पाहतो. मात्र या वस्तुस्थितीमुळे मला खूप अपराधीपणा वाटतो, मी माझ्या महिला सहकाऱ्यासोबत करू शकणाऱ्या कृती आणि क्रियांबाबत कल्पना करून शेवटी हस्तमैथुन करतो. मी खरंच वाईट आहे का?
उत्तर : वैवाहिक जीवनात हस्तमैथुन करणं ही वाईट गोष्ट नाही, हे प्रथम लक्षात ठेवा. खरं तर आपल्या संपूर्ण लैंगिक समाधानाची जबाबदारी एकाच व्यक्तीवर टाकणं ही बाब हास्यास्पद आहे. जेव्हा तुमच्या दोघांपैकी एकाला मूड नसतो, व्यस्त असतो किंवा अशा काही कल्पना आल्या तरी जोडीदार त्या पूर्ण करण्यास सक्षम नसतो, असं बऱ्याच वेळा घडतं. अशा वेळी रिलेशनशिप हेल्दी राहण्यासाठी हस्तमैथुन हा चांगला पर्याय असू शकतो.
त्याचप्रमाणे आपल्यात अशा काही लैंगिक भावना असतात की ज्या निषिद्ध मानल्या जातात, अशा भावनांबाबत तुम्ही तुमच्या पत्नीशी चर्चा करू शकत नाही. बेल्जियममधील सायकोथेरेपिस्ट इस्थर पिरेल म्हणतात की, सेक्स हे फक्त सेक्स असू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या जडणघडणीत सेक्स आणि लैंगिक वासनांप्रमाणेच अन्य गोष्टींचा अनुभव आणि क्रियांचा झालेला परिणाम हा देखील महत्त्वाचा ठरतो. एक व्यक्ती म्हणून तुम्हाला लैंगिक संबंधातून निरंतर आत्मिक समाधान, आनंद किंवा राग व्यक्त करता येणं अपेक्षित असतं. यातील कोणतीही बाब नसेल तर लैंगिक रोमांच तयार होऊ शकत नाही.
हे वाचा - Sexual Wellness : जोडीदारासमोर हस्तमैथुन केल्यानं काय होतं?
तुमच्या सारख्या अनेक व्यक्ती आपली कल्पनारम्यता (अगदी एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीसोबत असलेला क्रशसुद्धा) शेअर करीत असतात. म्हणजे आपण त्या व्यक्तीबरोबर सेक्स करत आहोत अशी कल्पना करून हस्थमैथुन करतात. अशा गोष्टींना हसणं आणि तू एक वाईट व्यक्ती आहे, असं म्हणणं त्या व्यक्तीवर परिणाम करू शकतं. अशा कल्पना रम्यतेमुळे तुम्ही वाईट व्यक्ती किंवा वाईट जोडीदार आहात, हे म्हणणं चुकीचे आहे. मानवी मेंदू ही एक विचित्र गोष्ट आहे. फक्त आपल्याकडेच अशा कल्पनांचा अर्थ असा लावला जातो की आपण अशा कल्पना तुमच्या मनात येतात म्हणजे तुम्ही तसं वागाल, पण तसं होत नाही. कल्पनेतच त्याचा आनंद असतो माणूस लगेच तशी कृती करत नाही.
हे वाचा - Sexual Wellness: पॉर्न पाहून हस्तमैथुन करण्याने आरोग्यावर वाईट परिणाम होईल का?
हा सर्व मानसिकतेचा भाग आहे हे प्रथम मान्य करावं आणि स्वतःला वाईट व्यक्ती समजणं थांबवावं, असं मी तुम्हाला सर्वात आधी सांगेन. दुसरं म्हणजे, असे विचार हे अनाहूत आहेत आणि तुमची इच्छा नसतानाही वारंवार ते मनात येत असतील किंवा जर परिस्थिती अधिकच बिघडून आपण कोणत्याही कल्पनांमध्ये हस्तमैथुन करण्यास असमर्थ ठरत असाल, बायकोमधील तुमचा रूची कमी होत असेल किंवा महिला सहकाऱ्यासमवेत असलेल्या कल्पना सत्यात आणण्याची तुमची इच्छा असेल तर मी तुम्ही एखाद्या थेरपिस्टचा सल्ला किंवा मार्गदर्शन घ्यावं, असं सांगेन. खोल मनात अशा प्रकारे कल्पनारम्यता सातत्याने तयार होत असेल तर या समस्येचा सामना करण्यासाठी तुम्हाला नियमित थेरपी उपयुक्त ठरेल, असं मला वाटतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sexual wellness