मराठी बातम्या /बातम्या /पुणे /आईला सोडायला निघालेल्या संकेतसोबत भयानक घडलं, मित्रही गेला, अख्ख गाव रडलं

आईला सोडायला निघालेल्या संकेतसोबत भयानक घडलं, मित्रही गेला, अख्ख गाव रडलं

संकेत डोके आपल्या आईला शिक्रापूर येथे सोडवायला निघाला असता काळाने घाला घातला .

संकेत डोके आपल्या आईला शिक्रापूर येथे सोडवायला निघाला असता काळाने घाला घातला .

संकेत डोके आपल्या आईला शिक्रापूर येथे सोडवायला निघाला असता काळाने घाला घातला .

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

शिरूर, 04 फेब्रुवारी : पुण्यातून अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. बेल्हे-जेजुरी महामार्गावर दुचाकी आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मायलेकांसह 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत आंबेगाव तालुक्याच्या खडकवाडी येथील असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,बेल्हे-जेजुरी महामार्गावर शुक्रवारी रात्री शिक्रापूर जवळच्या धामारी इथं भीषण अपघात होऊन तिघे जण ठार झाले आहेत. यात मायलेकांचा समावेश आहे. सर्व मृत आंबेगाव तालुक्याच्या खडकवाडी येथील आहे. खडकवाडी गावातील संकेत दिलिप डोके, आई विजयाताई दिलिप डोके आणि मित्र ओंकार चंद्रकांत सुक्रे यांचा अपघाता दरम्यान जागेवरच मृत्यू झाला आहे.

(नाशकात भर रस्त्यावर तरुणींमध्ये दे दणादण; फ्री स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल)

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. संकेत डोके आपल्या आईला शिक्रापूर येथे सोडवायला निघाला असता काळाने घाला घातला आहे. यामध्ये संकेतची आई, संकेत आणि त्याचा मित्र यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी शिक्रापूर पोलिसांनी जाऊन पंचनामा करून तिघांना रूग वाहिकेच्या साह्याने ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. संकेत आणि त्याच्या आईचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

(Krishna Chandgude : आईच्या मृत्यूनंतर मुलानं पाळलं सामाजिक भान, घेतला मोठा निर्णय)

दरम्यान, चिपळूण गुहागर मार्गावरील सकपाळवाडीजवळ एका कारला भीषण अपघात झाला. मुंबईमधून गावी जत्रेसाठी येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला गुहागर मार्गावर अपघात झाला आहे. गाडीचा स्टेरिंग लॉक झाल्यामुळे स्कॉर्पिओ कारची दुचाकीला धडक देत रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावरती जाऊन आदळली. या अपघातामध्ये सहा जण जखमी जखमी झाले आहे. जखमींवर चिपळूणमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईहून निर्वा येथे जत्रेसाठी जात असताना हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झालं आहे.

First published: