जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Krishna Chandgude : आईच्या मृत्यूनंतर मुलानं पाळलं सामाजिक भान, घेतला मोठा निर्णय

Krishna Chandgude : आईच्या मृत्यूनंतर मुलानं पाळलं सामाजिक भान, घेतला मोठा निर्णय

Krishna Chandgude : आईच्या मृत्यूनंतर मुलानं पाळलं सामाजिक भान, घेतला मोठा निर्णय

Krishna Chandgude : कृष्णा चांदगुडे यांनी आईच्या मृत्यूनंतर सामाजिक भान पाळलं आहे.

  • -MIN READ Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    नाशिक, 3 फेब्रुवारी : कर्मकांडाला फाटा देत वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी आपल्या आईचे देहदान करून सामाजिक भान पाळलं आहे. नुकतेच आजारपणामुळे त्यांच्या आई सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांच निधन झालं. त्यांचे वय 83 वर्ष होते. त्यांचा देह डाॅ. वसंतराव पवार मेडिकल काॅलेजला सुपूर्त करण्यात आला. त्यांचे कोणतेही कर्मकांड करणार नसल्याची माहिती कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे. विधवा प्रथा निर्मूलनाचे शासनाने परीपत्रक काढल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच सुगंधाबाई यांनी त्याची अंमलबजावणी केली होती. विधवा असुनही त्यांनी टिकली ,मंगळसूत्र, जोडवे परिधान केले होते. चांदगुडे कुटुंबीयांनी याआधीही अनेक पुरोगामी निर्णय घेऊन समाजाला आदर्श घालून दिला आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    सुगंधाबाई यांची आदरांजली सभा 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुळगावी चासनळी, ता-कोपरगाव येथे होणार आहे. यावेळी ‘देहदान व अवयवदान, काळाची गरज’ या विषयावर अवयवदान चळवळीचे कार्यकर्ता सुनील देशपांडे (उपाध्यक्ष,फेडरेशन ऑफ ऑर्गन अ‍ॅन्ड बाॅडी डोनेशन,मुंबई) यांचे व्याख्यान होणार आहे. या प्रसंगी मरणोत्तर देहदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींचे फाॅर्म भरून घेणार असल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले. अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान आपल्याकडे मृत्यूनंतर विधीवत अंत्यसंस्कार करून पार्थिवाची विल्हेवाट लावली जाते. अंत्यसंस्कारानंतर मानवी शरीरातील जे अवयव गरजूंना पुनर्जन्म देऊ शकतात, असे लाखमोलाचे अवयव पंचतत्त्वात विलीन होतात. यासाठी रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूनंतर अवयवदानाचे प्रमाण वाढले, तर गरजू रुग्णांचे जीवन सुखकर होऊन त्यांना नवसंजीवनी मिळू शकते. संपूर्ण भारतात अवयवदानाचे महत्त्व व तशी चळवळ उभी राहणे काळाची गरज आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात अवयवदानाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nashik
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात