जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात कारचा भीषण अपघात; दोन ठार, तीन जखमी

पुण्यात कारचा भीषण अपघात; दोन ठार, तीन जखमी

कारचा भीषण अपघात

कारचा भीषण अपघात

पुणे - सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. स्विप्ट कार पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 12  मार्च : पुणे - सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. स्विप्ट कार पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.  वैभव विठ्ठल जांभळे आणि प्रतीक पप्पू गवळी असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यता आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून अपघात  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुणे -सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या परिसरात हा अपघात झाला आहे. या कारमध्ये एकूण पाच जण प्रवास करत होते. सोलापूरच्या दिशेनं ही गाडी निघाली होती. दुपारच्या सुमारास गाडी स्वामी चिंचोली परिसरात येताच भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले, अनियंत्रीत झालेली चारचाकी पलटी झाली. Video : नाशकात रंगपंचमीला गालबोट, मोठा राडा; पोलिसांचा लाठीचार्ज दोन जणांचा मृत्यू  या भीषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाली आहेत. वैभव विठ्ठल जांभळे आणि प्रतीक पप्पू गवळी असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident
  • First Published :
जाहिरात
जाहिरात