नाशिक, 12 मार्च : आज रंगपंचमी आहे. राज्यभरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जाते. मात्र नाशिकमध्ये रंगपंचमीच्या या उत्सवाला गालबोट लागलं आहे. नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेला हा रंगोत्सव साजरा करण्यारसाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. मात्र गर्दी मोठ्याप्रमाणात वाढल्यानं उत्सवस्थळी चेंगराचेंगरीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
पोलिसांचा लाठीचार्ज
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमध्ये आज रहाड रंगपंचमीचं आयोजन करण्यात आलं होतं. रहाड रंगपंचमीच्या या कार्यक्रमाला तरुणाईने मोठी गर्दी केली होती. मात्र गर्दी वाढल्यानं तिथे चेंगराचेंगरीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती नियंत्रणबाहेर गेल्यानं लाठीचार्ज करण्यात आला.
Video : नाशिकमध्ये रंगपंचमीला गालबोट..#nashik pic.twitter.com/7gnUu3S5Vg
— News18Lokmat (@News18lokmat) March 12, 2023
रहाड बंद करण्याचा निर्णय
दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. धावपळ उडाल्याचं पहायला मिळालं. घटनेनंतर अवघ्या तासाभरात रहाड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik