जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / दोन ट्रॉली भरून उसासह ट्रॅक्टर भीमा नदीपात्रात कोसळला, चालक जागीच ठार

दोन ट्रॉली भरून उसासह ट्रॅक्टर भीमा नदीपात्रात कोसळला, चालक जागीच ठार

दोन ट्रॉली भरून उसासह ट्रॅक्टर भीमा नदीपात्रात कोसळला, चालक जागीच ठार

बंधाऱ्यावरून जात असताना अचानक चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. चालकाने ट्रॅक्टरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 18 नोव्हेंबर : पुणे (Pune)जिल्ह्यातील शिरुरमध्ये (Shirur) बंधाऱ्यावरून उसाने भरलेला ट्रॅक्टर (tractor accident) भीमा नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले आहे. शिरुरमध्ये हद्दीतील विठ्ठलवाडी बंधाऱ्यावर मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. दौड येथील श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्यावर नेहमी प्रमाणे ऊस घेऊन ट्रॅक्टरने वाहतूक सुरू होती. मंगळवारी रात्री दोन ट्रॉली भरून हा ट्रॅक्टर विठ्ठलवाडी हद्दीत आला होता. ‘बिहारमध्ये मित्रपक्षाला मुख्यमंत्रिपद, काय हे औदार्य’ सेनेचा फडणवीसांना टोला बंधाऱ्यावरून जात असताना अचानक चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. चालकाने ट्रॅक्टरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. दोन ट्रॉली भरून उसासह ट्रॅक्टर भीमा नदीपात्रात कोसळला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला, आता अशी अवस्था झाली की… घटनास्थळावर असलेल्या गावकऱ्यांनी ट्रॅक्टरचालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होा. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  चालक दौंड तालुक्यातील राहु येथील रहिवासी होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. भीमा नदीपात्रातून उशिरा मृत चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात