'बिहारमध्ये मित्रपक्षाला मुख्यमंत्रिपद, काय हे औदार्य' सेनेचा फडणवीसांना टोला

'बिहारमध्ये मित्रपक्षाला मुख्यमंत्रिपद, काय हे औदार्य' सेनेचा फडणवीसांना टोला

'महाराष्ट्रात भाजपच्या जागा जास्त निवडून आल्यामुळे शिवसेनेला (Shivsena) मुख्यमंत्रिपद दिले नाही, पण बिहारात (Bihar) तिसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या पक्षाला मुख्यमंत्रिपदाचा मुकुट बहाल केला'

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : 'नितीशकुमार (nitish kumar ) यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले. बिहारमध्ये ज्यांची कामगिरी ठसठशीत व चमकदार झाली असे तेजस्वी यादव (tejashwi yadav)विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही (Maharashtra) सगळ्यात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले. बिहारला (Bihar) विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप (BJP) नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल, असं म्हणत शिवसेनेनं (Shivsena) भाजपला (BJP) चांगलाच सणसणीत टोला लगावला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या (saamana) अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. बिहारमध्ये मित्रपक्षाला मुख्यमंत्रिपदाचा मान देण्यात आला, यावरून शिवसेनेनं भाजपचे नेते देवेद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला.

पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला, आता अशी अवस्था झाली की...

'बिहार निवडणुकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. विजयाचा उत्सव साजरा करीत आहेत ते ‘भाजप’वीर दुसऱ्या क्रमांकावर आणि तेजस्वी यादवांचा ‘राजद’ पहिल्या क्रमांकाचा शिलेदार आहे, पण दिल्या घेतल्या शब्दास जागून भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद बहाल केले. या मेहेरबानीच्या ओझ्याखालीच पुढचे दिवस ढकलावे लागतील या चिंतेने नितीशकुमारांच्या चेहऱ्यावरचे तेज उडाले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, ‘‘नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी शब्द दिला होता, तो पाळला. भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे.’’ महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिला नव्हता असे महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात. गंमत अशी की, बिहारचे सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकेल असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला, त्याच वेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून ते फार काळ चालणार नाही अशी खदखद व्यक्त करीत आहेत. या ढोंगास काय म्हणावे' असा टोला सेनेनं भाजपला लगावला.

'बिहारातील भाजप-जदयु सरकारचे बहुमत फक्त दोन-तीन आमदारांचे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तीस एक आमदारांचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची भाषा करणे म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे आहे. देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात बिहारचे प्रभारी होते. फडणवीस यांना बिहार सरकारकडेच जास्त लक्ष द्यावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. नितीशकुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक; पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल काय, हा प्रश्नच आहे. मागच्या सरकारात भाजपचे सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्री होते. नितीश यांचे ते खंदे पाठीराखे होते. यावेळी भाजपने नितीशकुमारांचा हा पाठीराखा घरीच बसवला आहे. सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री तर केले नाहीच, पण जास्त आकड्यांच्या जोरावर भाजपने एक सोडून दोन-दोन उपमुख्यमंत्री नेमले आहेत. त्यामुळे नितीशकुमारांची डोकेदुखी वाढणार आहे, असंही सेनेनं म्हटलं आहे.

'महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांसारखे नेते अधूनमधून काही पुड्या सोडत असतात आणि महाराष्ट्राचे राज्य शरद पवार चालवत असल्याचे टोमणे मारत असतात. महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच मताचे आहेत. या सगळ्यांनी यापुढे आता बिहारात नितीशकुमारांचे राज्य नक्की कोण चालवेल यावर नजर ठेवली पाहिजे. नितीशकुमार हे नामधारी मुख्यमंत्री असतील व एक दिवस ते इतके अपमानित होतील की, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल. नितीशकुमार यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले की, आपल्याला यावेळी मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण भाजपच्या आग्रहाखातर आपण ते पद स्वीकारत आहोत. भाजपच्या कर्तबगारीची ही कमालच म्हणावी लागेल किंवा फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे मोदी साहेबांचे बिहारवर विशेष प्रेम आहे. ते आता स्पष्टच दिसते' असा चिमटाही फडणवीसांना काढण्यात आला.

..नाहीतर सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

'महाराष्ट्रात भाजपच्या जागा जास्त निवडून आल्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले नाही, पण बिहारात तिसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या पक्षाला मुख्यमंत्रिपदाचा मुकुट बहाल केला. काय हे औदार्य! राजकारणातल्या या त्यागाचे वर्णन करायला शाई अपुरी पडेल, पण नितीशकुमार या मेहेरबानीच्या ओझ्याखाली किती काळ तग धरतील? की एक दिवस स्वतःच हे ओझे फेकून देतील व नवा रस्ता स्वीकारतील? असा सवालही सेनेनं उपस्थित केला आहे.

Published by: sachin Salve
First published: November 18, 2020, 7:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading