मराठी बातम्या /बातम्या /देश /

पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला, आता अशी अवस्था झाली की...

पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला, आता अशी अवस्था झाली की...

2011 मध्ये एका व्यक्तीने खरेच अशा पद्धतीने किडनी विकून iPhone 4 आणि iPad2 विकत घेतला होता.

2011 मध्ये एका व्यक्तीने खरेच अशा पद्धतीने किडनी विकून iPhone 4 आणि iPad2 विकत घेतला होता.

2011 मध्ये एका व्यक्तीने खरेच अशा पद्धतीने किडनी विकून iPhone 4 आणि iPad2 विकत घेतला होता.

    मुंबई, 17 नोव्हेंबर : अ‍ॅपल कंपनीने त्यांचे आयफोन लाँच केल्यानंतर नेहमी किडनी विकण्याबाबतचे जोक व्हायरल होत असतात. आयफोन इतका महाग आहे की तो घेण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागेल, अशा अर्थाचे जोक सोशल मीडियावर नागरिक टाकत असतात. परंतु चीनमध्ये 2011 मध्ये एका व्यक्तीने खरेच अशा पद्धतीने किडनी विकून iPhone 4 आणि iPad2 विकत घेतला होता. वांग शांगकुन असं या व्यक्तीचे नाव असून 2011 मध्ये तो 17 वर्षांचा होता. सध्या तो अंथरुणाला खिळून असून डायलिसीसवर आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या किडनीचे ऑपरेशन करण्यात आले होते. परंतु त्यामध्ये इन्फेक्शन झाल्याने त्याचा अवयव निकामी झाला. त्यामुळे दरमहिन्याला त्याची प्रकृती खालावत चालली आहे. तसंच त्याला बेडवरुनदेखील उठता येत नसून दररोज डायलिसिस करावं लागत आहे. नऊ वर्षांपूर्वी जे घडले ते खूप धक्कादायक होतं. त्यावेळी नवीन आलेला आयफोन 4 घेण्यासाठी तो खूप उत्सुक होता. त्यामुळे ऑनलाईन किडनी रॅकेट चालवणाऱ्यांच्या संपर्कात तो आला. त्यांनी एका किडनीच्या बदल्यात त्याला 20,000 युआन देण्याची ऑफर दिली. त्याला आयफोनचे वेध लागल्यानं त्याने या रॅकेटच्या मेसेजला रिप्लाय दिला. त्यानंतर त्याने ऑनलाईन व्यवहार नक्की केल्यानंतर त्याच्यावर चीनमधील सेंट्रल हुआनमध्ये बेकायदेशीर शस्त्रक्रिया करून त्याची किडनी काढून घेण्यात आली. फॉक्स न्यूजने गेल्या वर्षी नऊ वर्ष जुन्या वृत्तांचा उल्लेख केला होता. त्यामध्ये या व्यक्तीने म्हटले होते, त्याला एक किडनी पुरेशी असून दुसऱ्या किडनीची गरज नाही. या न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार, त्याच्या पालकांच्या परवानगीविना हे ऑपरेशन करण्यात आलं होतं. स्थानिक दवाखान्यातील दोन डॉक्टरांनी हे ऑपरेशन केले होते. यामध्ये पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. यामध्ये ऑपरेशन करणाऱ्या दोन डॉक्टरांचा देखील समावेश होता. या घटनेत शँगकुनच्या कुटुंबाला सुमारे 3,00,000 डॉलर्सची नुकसान भरपाई मिळाली. 22,369,597.54 रुपये इतकी भारतीय चलनामध्ये ही रक्कम आहे. त्याच्या कुटुंबाला आयफोन घेणं परवडत नाही म्हणून त्याने मित्रांसमोर मिरवण्यासाठी चक्क आपली किडनी विकून आयफोन आणि आयपॅड खरेदी केले होते.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Iphone

    पुढील बातम्या