पुणे, 19 डिसेंबर : सार्वजनिक ठिकाणी आपल्याला अनेकदा अस्वच्छ शौचालयाची समस्या जाणवते. आपल्या जवळपास शौचालय कुठं आहे, हे शोधावं लागतं. या सर्व त्रासातून पुणेकरांची सुटका होणार आहे. कारण, पुण्यातील तरुणाने 'टॉयलेट सेवा ॲप' सुरू केले आहे. हे ॲप पूर्णपणे मोफत असून हे ॲप बनवायची कशी कल्पना सुचली याची गोष्ट देखील अतिशय रंजक आहे.
लक्ष्मी रोडवर आला अनुभव
अमोल भिंगे या तरुणानं हे ॲप बनवले आहे. अमोल एकदा लक्ष्मी रोडला सराफाच्या दुकानात खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना टॉयलेटला जाण्याची गरज लागली. त्या सराफाच्या दुकानात अतिशय अस्वच्छ टॉयलेट होते. अमोल यांनी हा अनुभव त्या दुकानदाराला सांगितला. त्यावर फक्त तुम्हालाच हा त्रास आहे, इतरांना नाही असं उत्तर त्यांना ऐकायला मिळालं. या अपमानातून अमोल यांनी धडा घेतला आणि हे ॲप तयार केले.
कसं आहे ॲप?
या ॲपमध्ये आपल्याला विविध हॉटेल्स, मॉल, शॉप्स, सार्वजनिक बागा या ठिकाणी असलेल्या शौचालयांची माहिती मिळेल. एवढेच नाही तर यामध्ये आपण कोणती शौचालय स्वच्छ आहेत ही माहिती देखील अपडेट करु शकतो. सर्वसामान्य युझर्स देखील आपल्याला ठीक वाटलेली शौचालयं या ॲपमध्ये रजिस्टर करू शकतात.
उपचारांचा मोठा खर्च वाचणार, फक्त 700 रुपयांमध्ये होणार सिटीस्कॅन
या ॲपमधील टॉयलेटचा प्रत्येकानी रिव्ह्यू दिलेला आहे. त्यामुळे त्याची अपडेट माहिती सर्वांना समजते. एकदा रजिस्टर करण्यात टॉयलेट स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्या मालकावर येते. हे ॲप सर्वासांठी मोफत उपलब्ध आहे. अमोल यांनी याबाबत सांगितले की, 'आपल्या देशामध्ये टॉयलेटची संख्या अतिशय नगण्य आहे. जे टॉयलेट्स आहेत त्यातली अनेक टॉयलेट्स अतिशय गलिच्छ आणि अस्वच्छ असतात.
केकवर साकारली बनारसी साडी, जगाला दाखवली भारतीय संस्कृती! Video
या ॲपद्वारे जास्तीत जास्त नागरिकांनी आपले टॉयलेट बद्दलचे रिव्ह्यू दिले तर टॉयलेट चालकांना आपले टॉयलेट स्वच्छ ठेवणे आवश्यक वाटेल. इतर गोष्टी कितीही सुंदर असल्या तरीही सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट जर स्वच्छ असतील तर सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य देखील यामुळे चांगले राहू शकते. पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती चांगले स्वच्छ टॉयलेट नागरिकांना उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.