जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune : केकवर साकारली बनारसी साडी, जगाला दाखवली भारतीय संस्कृती! Video

Pune : केकवर साकारली बनारसी साडी, जगाला दाखवली भारतीय संस्कृती! Video

Pune : केकवर साकारली बनारसी साडी, जगाला दाखवली भारतीय संस्कृती! Video

भारतीय संस्कृतीचा हा पैलू ‘शुभ शृंगार केक’ या संकल्पनेतून साकारण्याची किमया पुण्यातील एका कलाकाराने साधली आहे.

  • -MIN READ Local18 Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 17 डिसेंबर :  उच्च दर्जाचे रेशीम आणि भरगच्च जरीकाम आणि हिंदुस्तानी संकृतीची ओळख म्हणून बनारसी साडी जगप्रसिद्ध आहे.  भारतीय संस्कृतीचा हा पैलू  ‘शुभ शृंगार केक’ या संकल्पनेतून साकारण्याची किमया पुण्यातील एका कलाकाराने साधली आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीला जगभभरातून दाद मिळत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब यांनी नुकतेच ‘बनारसी साज’ संकल्पनेवर आधरित भव्य असा रॉयल आयसिंग केक तयार केला आहे. इटलीमध्ये झालेल्या ‘इंटरनॅशनल केक प्रोजेक्ट’साठी त्यांनी हा भव्य केक तयार केला. या प्रोजेक्टसाठी जगभरातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना केकच्या माध्यमातून देशाची संस्कृती सादर करण्याचे टास्क देण्यात आले होते. बनारसी साडी का? या प्रोजेक्टसाठी पुण्यातून प्राची यांना आमंत्रित करण्यात आले होते. या केकमध्ये पारंपरिक भारतीय वेशभूषेतील लोकप्रिय प्रकार असलेली बनारसी साडी आणि पारंपारिक दागिने सादर करण्यात आले आहे. ‘मला भारतीय वारसा आणि संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करायची होती. त्याचबरोबर माझ्या मनाच्या अगदी जवळ असलेली कलाकृती करण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मी बनारसी साडीचा पर्याय निवडला. ही साडी मला आईकडून मिळाली होती. त्यामुळे तिच्याशी वारसा आणि आपलेपणा हे दोन्ही घटक जोडले आहेत,’ असे प्राची यांनी सांगितलं. पुरणपोळीसाठी सणांची प्रतीक्षा संपली, एकाच ठिकाणी मिळतात तब्बल 24 प्रकार काय आहे खासियत? मी  32 इंच भव्य बनारसी साडी आधारित केक तयार केलाय. या केकमध्ये आकर्षक रंग, आकृतिबंध, फुलांची वैशिष्ट्ये, साडीवरील चांदी,  सोनेरी जरीचे काम असे अगदी बारीक तपशील लक्षात घेऊन बनविलेले पारंपारिक दागिने यांचे मिश्रण आहे. या केक’ची रचना सिंदूर-दाणी प्रमाणे करण्यात आली आहे. हा केक हाताने विणलेल्या साडीप्रमाणे दिसावा, यासाठी हजारो स्वतंत्र ठिपके वापरून फुलांचे घटक केले गेले आहेत. त्यांना खाण्यायोग्य सोनेरी रंगाने रंगवण्यात आलंय,’ असं प्राची यांनी स्पष्ट केले. हा ‘बनारसी साडी केक’ सध्या प्राची यांच्या पुण्यातील केक स्टुडिओमध्ये आहे. या केक स्टुडिओमध्ये प्रवेश करताच तुम्ही रोआल्ड डहलच्या ‘चार्ली अँड चॉकलेट फॅक्टरी’च्या भव्य रचनेत प्रवेश केल्याप्रमाणे कल्पनारम्य जगात पोहोचता.  चार्ली हे पात्र ज्याप्रमाणे कारखान्यात फिरतो आणि चॉकलेटचे फट पाहत मंत्रमुग्ध होतो, त्याचप्रमाणे प्राचीने साकारलेल्या ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रकारातील आणि अतिशय आकर्षक कलाकृती पाहून आपण थक्क होतो. स्पर्धा  परीक्षेत अपयश आलं म्हणून काय झालं… पाणीपुरी व्यवसायातून घेतली नवी भरारी, Video क्वीन ऑफ रॉयल आयसिंग मध्य प्रदेशातील रीवा येथे जन्मलेल्या प्राची यांनी आपले शालेय शिक्षण उत्तराखंड येथील डेहराडून येथे पूर्ण केले. त्यांनी कोलकाता येथून महाविद्यालयीन पदवीचे शिक्षण घेतले. त्यांचे पती हे पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून आयटी क्षेत्रातील कर्मचारी आहेत. प्राची या सध्या त्या पिंपरी चिंचवड येथील रहाटणी परिसरात राहतात. प्राची यांनी रॉयल आयसिंग या किचकट कलेचे शिक्षण युनायटेड किंगडममध्ये जगप्रसिद्ध केक आयकॉन सर एडी स्पेन्स एमबीई यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. सामान्यतः, पारंपारिक पाककलेत रॉयल आयसिंग’साठी अंडयाचा वापर केला जातो. परंतु भारतीय बाजारपेठ लक्षात घेत, प्राचीने अंड्याचा वापर न करता, पूर्णत: शाकाहारी उत्पादन ‘व्हेगन रॉयल आयसिंग’ विकसित केले. भारतीय कंपनी-सुगारिनच्या सहकार्याने हे स्मारक साकारण्यात आले असून, प्राची यांचे हे उत्पादन भारतात, तसेच जगभरात उपलब्ध आहे. अख्खं गावच आहे शाकाहारी, लग्नानंतर मुलीही सोडतात मांसाहार, Video प्राची यांनी व्हेगन रॉयल आयसिंग केक या प्रकारात अनेक उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती साकारल्या आहेत. त्यांच्या कलात्मकतेसाठी त्यांना ‘क्वीन ऑफ रॉयल आयसिंग’ असे म्हंटले जाते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात