जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : उपचारांचा मोठा खर्च वाचणार, फक्त 700 रुपयांमध्ये होणार सिटीस्कॅन

Aurangabad : उपचारांचा मोठा खर्च वाचणार, फक्त 700 रुपयांमध्ये होणार सिटीस्कॅन

Aurangabad : उपचारांचा मोठा खर्च वाचणार, फक्त 700 रुपयांमध्ये होणार सिटीस्कॅन

आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या रुग्णांना सिटीस्कॅन करणं शक्य होत नाही. यामुळे सिटीस्कॅन 700 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

  • -MIN READ Local18 Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद, 17 डिसेंबर : गरजू रुग्णांना 2 ते 3 हजार रुपये सिटीस्कॅन आणि एक्स-रे करण्यासाठी खर्च करावे लागतात. त्यामुळे बऱ्याच वेळा सिटीस्कॅन आणि एक्स-रे तपासणी शक्य होत नाही. यासाठीच औरंगाबाद शहरातील महानगरपालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन आणि एक्स-रे या तपासण्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये सिटीस्कॅन फक्त 700 रुपये तर एक्स-रे 100 रुपये शुल्कामध्ये करून दिले जाणार आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडले यांनी दिली आहे. आजारी रुग्णांना मोठी शस्त्रक्रिया किंवा मोठ्या आजाराचे उपचार घ्यायचे असेल तर सिटीस्कॅन आणि एक्स-रे तपासणी करणे गरजेच असतं. मात्र, सिटीस्कॅन करण्यासाठी 2 ते 3 हजार रुपये खर्च येतो. यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या रुग्णांना हे करणं शक्य होत नाही. यामुळे त्यांना अनेकदा उपचार घेण्यापासून वंचित राहावं लागतं. ही गोष्ट लक्षात घेऊन औरंगाबाद महानगरपालिकेने शहरातील रुग्णांसाठी मेल्ट्रॉन हॉस्पिटल सिटीस्कॅन 700 रुपये तर एक्स-रे 100 रुपयांमध्ये करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे गरजू रुग्णांना कमी पैश्यामध्ये उपचार घेणे शक्य होणार आहे.

    Aurangabad: गुटखा खाताय सावधान, पाहा 75 जणांचे काय झाले हाल, Video

    सिटीस्कॅनचा वापर शरीरातील ज्या आतील जखमा किंवा रोगाचे निदान करण्यासाठी केला जातो. तसेच वैद्यकीय शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन उपचारांच्या दिशा ठरवण्यासाठी देखील सिटीस्कॅनचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. सुविधांचा  नागरिकांनी लाभ घ्यावा  औरंगाबाद महानगरपालिकेने नागरिकांची गरज लक्षात घेऊन सिटीस्कॅन आणि एक्स-रे च्या तपासणीसाठी लागणारा खर्च लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये मध्ये सिटीस्कॅन 700 रुपये तर एक्स-रे 100 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. या सुविधांचा  नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉ.पारस मंडले यांनी केलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात