Home /News /pune /

Google Pay करायला लावलं अन् अडकली जाळ्यात; पुण्यात उच्चशिक्षित तरुणीवर दोघांकडून बलात्कार

Google Pay करायला लावलं अन् अडकली जाळ्यात; पुण्यात उच्चशिक्षित तरुणीवर दोघांकडून बलात्कार

Rape in Pune: पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची (educated young woman raped by 2) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    पुणे, 15 ऑक्टोबर: पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची (educated young woman raped by 2) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर, गुगल पेवरून (Google pay) पेमेंट करत असताना पीडितेची आरोपीशी ओळख झाली होती. यातूनच आरोपीनं पीडित तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे. यानंतर आरोपीने आपल्या अन्य एका मित्राच्या मदतीने पीडित तरुणीवर अत्याचार केला आहे. तसेच नराधमांनी अत्याचार करताना व्हिडीओ देखील आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड (Shoot obscene videos) केला होता. आरोपींच्या अन्य एक मित्राने हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Obscene videos viral on social media) करत पीडितेला धमकावलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विकी ऊर्फ विकास विनायक राठोड (वय-21, पैठण), निखिल प्रताप पाटील (वय-31, लातूर) आणि  अमर गोरखनाथ राठोड (वय-23, पैठण) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पीडित तरुणीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर, पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी विकी आणि निखिलने अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. आरोपी विकी आणि निखिल हे काही दिवसांपूर्वी नोकरीच्या शोधात पुण्यात आले होते. हेही वाचा-चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या मुलावर हल्ला, धारदार शस्त्राने मुंबईकर तरुणाला केल ठार तसेच आरोपी विकीने अत्याचार केल्याचा व्हिडीओ आपला गावाकडील मित्र अमर राठोडला पाठवला होता. त्यानंतर आरोपी अमरने संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत पीडितेला धमकी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. तर पीडित तरुणी आपल्या उच्च शिक्षणासाठी काही दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. येथील एका खाजगी हॉस्टेलमध्ये ती वास्तव्याला आहे. हेही वाचा-पुतण्याची हत्या केल्याने भोगला 10 वर्षांचा तुरुंगवास, सुटका होताच मेहुणीची हत्या दरम्यान रविवारी खानावळ बंद असल्याने पीडित तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत जंगली महाराज रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आली होती. याठिकाणी जेवण केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी तरुणीकडे गुगल पे नव्हतं, त्यामुळे तिने याठिकाणी जेवायला आलेल्या विकीला पेमेंट करण्याची विनंती केली. यातूनच दोघांची मैत्री झाली. तसेच दोघांनी एकमेकांचे मोबाइल नंबरही घेतले. यानंतर आरोपी विकी आणि त्याचा मित्र निखिलने तरुणीशी जवळीक वाढत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले आहेत. हेही वाचा-Whatsapp वर सुरु होतं ऑन डिमांड Sex Racket, म्होरक्या अटकेत दरम्यान आरोपीनं पीडितेवर अत्याचार करतानाचा व्हिडीओ शूट करून तिला अनेकदा  ब्लॅकमेल देखील केलं आहे. तसेच आरोपी विकीने हा व्हिडीओ आपला गावकडील मित्र अमरला पाठवला होता. त्याने संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत पीडित तरुणीला धमकी दिली आहे. याप्रकरणी पीडितेनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Rape

    पुढील बातम्या