• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • आधी पार्टी केली मग डोक्यात घातली गोळी; पुण्यातील अभियंत्याच्या हत्याकांडाला वेगळं वळण

आधी पार्टी केली मग डोक्यात घातली गोळी; पुण्यातील अभियंत्याच्या हत्याकांडाला वेगळं वळण

Murder in Pune: पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत एका संगणक अभियंत्याचा राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता.

 • Share this:
  पुणे, 15 ऑक्टोबर: सोमवारी पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत एका संगणक अभियंत्याचा राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता. डोक्यात गोळी लागल्याने त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली? याचं गूढ बनलं होतं. पण कोंढवा पोलिसांनी तपास करत या घटनेचा उलगडा केला आहे. मृत अभियंत्याची त्याच्याच मित्रांनी हत्या (software engineer murder by his friend)केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोन्ही मित्रांना अटक (2 Accused friends arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. गणेश यशवंत तारळेकर असं हत्या झालेल्या 47 वर्षीय संगणक अभियंत्याचं नाव असून ते कोंढवा बुद्रुक परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत वास्तव्याला होते. मृत तारळेकर विवाहित असून त्यांना एक 14 वर्षांचा मुलगा देखील आहे. पण काही कौटुंबीक वादामुळे त्यांची पत्नी आपल्या मुलाला घेऊन माहेरी राहत होत्या. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मृत तारळेकर घरी एकटेच राहत होते. तसेच त्यांची हत्या होण्यापूर्वी दोन दिवस आधी त्यांनी आपल्या सासऱ्या फोन करून आपण आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे तारळेकर यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांना होता. हेही वाचा-पुतण्याची हत्या केल्याने भोगला 10 वर्षांचा तुरुंगवास, सुटका होताच मेहुणीची हत्या पण घटनेच्या दिवशी तारळेकर यांनी आपल्या दोन मित्रांसोबत राहत्या घरात पार्टी केल्याची माहिती समोर आल्यानंतर, पोलिसांनी संबंधित दोन्ही मित्रांना ताब्यात घेऊन तपास केला. पोलीस तपासात संबंधित मित्रांनीच पार्टी सुरू असताना, तारळेकर यांच्या डोक्यात गोळी घालून त्यांची हत्या (software engineer shot dead) केल्याचं उघड झालं आहे. घटना घडल्यानंतर आरोपी मित्र घटनास्थळावरून पसार झाले होते. हेही वाचा-गुगल पे करायला लावलं अन् अडकली जाळ्यात;पुण्यात उच्चशिक्षित तरुणीवर दोघांकडून रेप पण पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सागर दिलीप बिनावत (वय-33) आणि दत्तात्रय देविदास हजारे (वय-47) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी स्फूर्ती तारळेकर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपींनी नेमकी कोणत्या कारणातून तारळेकर यांची हत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पण कोंढवा पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: