300 विद्यार्थ्यांसमोर दाटला 'अंधार', पुणे विद्यापीठानं केला मोठा खुलासा

फेर परीक्षेचा विद्यार्थांना ईमेलच प्राप्त झाला नसल्याचा स्टूडंट्स वेलफेअर असोसिएशनचा दावा

फेर परीक्षेचा विद्यार्थांना ईमेलच प्राप्त झाला नसल्याचा स्टूडंट्स वेलफेअर असोसिएशनचा दावा

  • Share this:
पुणे, 12 नोव्हेंबर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं (Savitribai Phule Pune University) पुन्हा फेर परीक्षा (re examination) घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे सुमारे 300 विद्यार्थ्यांचं (Student) वर्ष वाया जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी आलेल्या एकाही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. पीडित विद्यार्थ्यांना पुन्हा फेर परीक्षा देता येणार आहे. पण तांत्रिक त्रुटींच्या आडून विद्यापीठाची दिशाभूल करणाऱ्या परीक्षांर्थींवरही कारवाई होणार असल्यासं सावित्रीबाई परीक्षा विभाग नियंत्रक महेश काकडे यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला माहिती दिली. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ देणार नाही. पुणे विद्यापीठाचे 90 टक्के निकाल जाहीर असल्याचं कुलगुरू नितीन कळमरकर यांनी सांगितलं आहे. हेही वाचा....चिंता वाढली! Pfizer Vaccine दिल्यानंतर लोकांमध्ये दिसली विचित्र लक्षणं मात्र, फेर परीक्षेचा विद्यार्थांना ईमेलच प्राप्त झाला नसल्याचा दावा स्टूडंट्स वेलफेअर असोसिएशनचे (Students Welfare Association)अध्यक्ष वैभव एडके यांनी केला आहे. ऑनलाईन तांत्रिक अडचणीमुळेही आधीच विद्यार्थी परीक्षेला मुकले होते. त्यात पुणे विद्यापीठानं फेर परीक्षा घेण्यास नकार दिल्यानं विद्यार्थांचं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. वैभव एडके यांनी सांगितलं की, विविध कारणांमुळे फेर परिक्षेलाही मुकलेल्या 300 विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्याची विनंती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे केली. पण आम्ही 5 ते 7 नोव्हेंबरदरम्यान फेर परीक्षा घेतली असल्याचं सांगत विद्यापीठानं या मुलांच्या तक्रारी अर्जांना केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचं भवितव्यच टांगणीला लागलं आहे. निकालात 20 ते 30 टक्क्यांची वाढ दुसरीकडे, पुणे विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या निकालात सुमारे 20 ते 30 टक्यांनी वाढ झाली आहे.काही अभ्यासक्रमांचे निकाल तर 100 टक्के लागले आहेत. राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व विद्यार्थी घरी होते. त्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला आणि त्या फायदा विद्यार्थ्यांना झाल्याचं समोर आल्याचं विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 12 ते 31 ऑक्टोबरदरम्यान परीक्षा घेतली. पुणे विद्यापीठानं पहिल्यांदाच बहुपर्यायी स्वरूपात आणि ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनं परीक्षा झाली. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळालेला वेळ आणि कमी काठिण्यपातळी यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांच्या निकालात वाढ झाली. हेही वाचा..धनत्रयोदशी आधी सराफावर संकट, ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी लुटलं लाखोंचं सोनं परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच फेरपरीक्षाही घेण्यात आली. काही अभ्यासक्रमांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. 'आतापर्यंत 21 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व निकाल घोषित होतील,' असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: