VIDEO : धनत्रयोदशी आधी सराफावर संकट, ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी लुटलं लाखोंचं सोनं

VIDEO : धनत्रयोदशी आधी सराफावर संकट, ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी लुटलं लाखोंचं सोनं

गर्दी आणि घोळक्याचा फायदा घेऊन चोर आणि भामट्यांनी लुटण्याचे प्रकार सुरू केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : आधीच कोरोनाचं संकट आणि त्यानंतर नुकतेच नियमित सुरू होणारी सराफांची दुकानं यामुळे कुठेतरी दिलासा मिळणार तेवढ्यात ऐन सणासुदीला चोरांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. बिहार आणि राजस्थानमध्ये दोन ठिकाणी जवळपास 10 लाखांचे सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या घटना सतत घडत असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस बंदोबस्त आणि पोलीस प्रशासनावर स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

बाडमेर जिल्ह्यातील गोसाई ई-मित्र दुकानात बुधवारी रात्री उशिरा चोरांनी तीन लाखाहून अधिक रोख रक्कम आणि काही दागिने लंपास केले.ही संपूर्ण घटना दुकानात बसलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सकाळी सराफ दुकानात आले तेव्हा दुकान अस्ताव्यस्त पाहून मोठा धक्का बसला. संपूर्ण दुकानावर हात साफ करून चोर पसार झाले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून व्हिडीओच्या आधारे चोरांचा तपास सुरू आहे.

हे वाचा-घराला होतं कित्येक दिवस कुलूप, पोलिसांनी टाळं उघडलं तर सापडले 6 मृतदेह

बिहारमध्ये दिवाळीनिमित्तानं बाजारपेठेतील खरेदीला लोक मोठ्या प्रमाणात येत आहे. गर्दी आणि घोळक्याचा फायदा घेऊन चोर आणि भामट्यांनी लुटण्याचे प्रकार सुरू केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. धनत्रयोदशीच्या आधी जवळपास चोरांनी 10 लाखांचा सराफाला गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चैनपूर बाजारपेठेत सकाळी 11.30 च्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी ग्राहक असल्याचा बनाव केला आणि सराफाच्या दुकानात तब्बल 10 लाखांची चोरी केली. ही घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 12, 2020, 12:05 PM IST

ताज्या बातम्या