पुणे, 20 ऑक्टोबर: पुण्याजवळील तळेगाव परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या विवाहित मामेबहिणीवर तब्बल अडीच वर्षे अत्याचार केला (brother raped uncle's daughter) आहे. पीडित महिलेवर बलात्कार करतानाचे व्हिडीओ पतीला दाखवेल (Threat to show obscene videos to husband), अशी धमकी देत आरोपीनं पीडितेवर अनेकदा अत्याचार केला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून आरोपी आपल्याच मामेबहिणीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर 34 वर्षीय पीडित बहिणीने आपल्या आतेभावाविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.
पीडित बहिणीच्या तक्रारीनंतर, तळेगाव पोलिसांनी आरोपी आतेभावाविरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. आरोपी तरुणाला पोलिसांनी अद्याप अटक केली नसून या घटनेचा तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी विवाहित असून पुणे जिल्ह्यातील तळेगाव परिसराक वास्तव्याला आहे. दरम्यान एकेदिवशी आरोपी आतेभाऊ पीडितेच्या घरी आला होता. यावेळी पीडित महिलेचा नवरा घरी नव्हता.
हेही वाचा-दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या अभिनेत्रीसोबत विमानात अश्लील चाळे; विकृताला अटक
घरी नवरा नसल्याची संधी साधून आरोपी आतेभावानं पीडित महिलेवर बळजबरी करत, तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने फिर्यादीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओ पीडितेच्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना दाखवण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या विवाहित बहिणीवर आतेभावानं अनेकदा बलात्कार केला आहे.
हेही वाचा-नराधमाने GF ला केलं मित्रांच्या स्वाधीन; ठाण्यात चौघांकडून तरुणीवर कारमध्ये रेप
गेल्या अडीच वर्षांपासून भाऊ पीडितेला त्रास देत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं तळेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीनं जानेवारी 2019 पासून जून 2021 पर्यंत अनेकदा बलात्कार केल्याचं फिर्यादीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Rape