मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नराधमाने प्रेयसीला केलं मित्रांच्या स्वाधीन; ठाण्यात चौघांकडून तरुणीवर कारमध्ये बलात्कार

नराधमाने प्रेयसीला केलं मित्रांच्या स्वाधीन; ठाण्यात चौघांकडून तरुणीवर कारमध्ये बलात्कार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Gang Rape in Thane: ठाण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर चार मित्रांनी सामूहिक बलात्कार (Young woman gang raped by 4 friends) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ठाणे, 20 ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी ठाण्यानजीक असणाऱ्या डोंबिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी बलात्कार (Dombivli Gang Rape Case) केला होता. आरोपीनं पीडित मुलीला विविध ठिकाणी नेत, अत्याचार केला होता. या घटनेनं राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आता, ठाण्यात (Thane) एका 26 वर्षीय तरुणीवर चार मित्रांनी सामूहिक बलात्कार (Young woman gang raped by 4 friends) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने मंगळवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR Lodged) केली आहे. कासारवडवली पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पोलीस पथकं तयार केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

गोविंद राजभर (वय-32) असं गुन्हा दाखल झालेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे. तर 26 वर्षीय पीडित तरुणी ठाण्यातील एका बारमध्ये वेटर म्हणून काम करते. आरोपी गोविंद हा नेहमी संबंधित बारमध्ये यायचा. याठिकाणी आरोपीची पीडित तरुणीसोबत ओळखा झाली होती. त्यानंतर आरोपीने गोविंदने पीडित तरुणीशी मैत्री वाढवत तिला लग्नाचं आमिष दाखवलं (Lure of marriage) होत.

हेही वाचा-पुणे: झोपलेल्या जागीच केला घात; पंख्याच्या पात्याने गळा चिरून सख्ख्या भावाचा खून

तसेच, नवीन घर खरेदी करण्यासाठी आरोपीनं पीडित तरुणीकडून सात लाख 55 हजारांची रोकड आणि दागिने घेतले होते. त्यानंतर पीडितेला ठाण्यातील एका हॉटेलमध्ये नेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. यावेळी आरोपीनं पीडितेचे अश्लील व्हिडीओ काढले (Shoot obscene videos) होते. हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपोनं घोडबंदर येथील एका  हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं पीडितेला आपल्या अन्य तीन मित्रांच्या हवाली केलं.

हेही वाचा-मुंबईत Sex Tourism रॅकेटचा पर्दाफाश, सेक्स टुरिझम असतं तरी काय?

संबंधित तीन मित्रांनी पीडित तरुणीवर कारमध्येच सामूहिक बलात्कार केला आहे. हा धक्कादायक प्रकार 1 फेब्रुवारी 2019 ते 30 ऑगस्ट 2021या कालावधीत घडल्याचं पीडित तरुणीने आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी गोविंद राजभर याच्यासह त्याच्या अन्य तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Gang Rape, Thane