मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या अभिनेत्रीसोबत विमानात अश्लील चाळे; विकृत व्यावसायिकाला अटक

दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या अभिनेत्रीसोबत विमानात अश्लील चाळे; विकृत व्यावसायिकाला अटक

दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या अभिनेत्रीचा एका विकृताने विमानातच विनयभंग केला आहे.  (File Photo)

दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या अभिनेत्रीचा एका विकृताने विमानातच विनयभंग केला आहे. (File Photo)

Crime in Mumbai: दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या अभिनेत्रीचा एका विकृताने विमानातच विनयभंग (sexual molestation of actress in Flight) केला आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर: दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या अभिनेत्रीचा एका विकृताने विमानातच विनयभंग (sexual molestation of actress in Flight) केला आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी गाझियाबाद येथील रहिवासी असणाऱ्या एका व्यावसायिकाला अटक (Accused businessman arrest) केली आहे. दिल्लीहून आलेलं विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर पीडित अभिनेत्री तिची बॅग बाहेर काढण्यासाठी ओव्हरहेड स्टोरेज उघडण्यासाठी उठली होती. दरम्यान आरोपीनं पीडित अभिनेत्रीला अश्लील स्पर्श (Bad touch) केले आहेत. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर सहार पोलिसांनी व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अभिनेत्री दिल्लीहून मुंबईला येत होती. विमान जेव्हा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं. तेव्हा विमानातील एका व्यक्तीने पीडित अभिनेत्री अश्लील स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण घडताच अभिनेत्रीनं लगेच केबिन क्रूकडे तक्रार केली. यावेळी अभिनेत्रीने संताप व्यक्त करताच, आरोपीनं लगेच माफीही मागितली.

हेही वाचा-मुंबईत पुन्हा ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटींच्या हिरोइनसह महिला तस्करला अटक

यानंतर, या संतापजनक घटनेची माहिती फ्लाइट क्रूने सहार विमानतळ पोलिसांना कळवली. यानंतर सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा-नराधमाने GF ला केलं मित्रांच्या स्वाधीन; ठाण्यात चौघांकडून तरुणीवर कारमध्ये रेप

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने क्रू मेंबरला स्वत:बाबत चुकीची माहिती दिली होती. त्याने आपलं नाव राजीव असल्याचं क्रू मेंबरला सांगितलं होतं. पण त्याचं खरं नाव नितीन असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपीचे छायाचित्र दाखवून अभिनेत्रीकडून घटनेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी गाझियाबाद येथील व्यावसायिकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Mumbai