मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात लॉकडाऊन होणार का? वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापौरांनी दिला 'हा' इशारा

पुण्यात लॉकडाऊन होणार का? वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापौरांनी दिला 'हा' इशारा

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी निर्बंध (Restrictions) अधिक कडक करण्याचा इशारा दिला आहे. शहरामध्ये कोरोना रुग्णसंख्या (Corona Cases in Pune) झपाट्यानं वाढत असल्यानं याबद्दल विचार सुरू आहे.

पुणे 22 मार्च : देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. महाराष्ट्र यात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातही मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर या शहरांमध्ये वारंवार कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. अशात आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी या परिस्थितीवर प्रतिक्रिया देत निर्बंध (Restrictions) अधिक कडक करण्याचा इशारा दिला आहे.

मोहोळ म्हणाले, की पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये दररोज 3000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण (Corona Cases in Pune) आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिक आणि प्रशासन सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सोबतच ऑक्सिजन बेडची संख्याही वाढवण्यात येणार आहे. महापौर पुढे म्हणाले, की सुदैवानं 23 हजार सक्रीय रुग्णांपैकी 85 टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ही बाब दिलासादायक आहे.

सोबतच दररोज 15 हजार चाचण्या आणि 20 लसीकरण करून कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी उपाययोजना वाढवण्यात येतील मात्र लॉकडाऊन (Lockdown) करण्यात येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रसार पाहाता लॉकडाऊन केलं नाही तर निर्बंध आणखी कडक करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहितीदेखील महापौरांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात रविवारी 30,535 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 99 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.15 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,83,56,200 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 24,79,628 (13.51 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,69,867 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 9,601 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्याशिवाय आज राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 2,10,120 इतकी आहे.

First published:

Tags: Corona, Covid-19, Lockdown, Maharashtra, Pune, Pune cases