Home /News /pune /

....मग RSS च्या प्रमुखपदी सरसंघचालक म्हणून मुस्लीम व्यक्तीला बसवणार का? संभाजी ब्रिगेडचा थेट सवाल

....मग RSS च्या प्रमुखपदी सरसंघचालक म्हणून मुस्लीम व्यक्तीला बसवणार का? संभाजी ब्रिगेडचा थेट सवाल

'आरएसएसचा 'सरसंघचालक' मुस्लिम बनवून दाखवा. राजकारण करण्यासाठी धर्म आडवा येत असेल तर RSS च्या सरसंघचालक पदी 'महिला' बनवून दाखवा'

'आरएसएसचा 'सरसंघचालक' मुस्लिम बनवून दाखवा. राजकारण करण्यासाठी धर्म आडवा येत असेल तर RSS च्या सरसंघचालक पदी 'महिला' बनवून दाखवा'

'आरएसएसचा 'सरसंघचालक' मुस्लिम बनवून दाखवा. राजकारण करण्यासाठी धर्म आडवा येत असेल तर RSS च्या सरसंघचालक पदी 'महिला' बनवून दाखवा'

पुणे, 07 सप्टेंबर : 'हिंदू (hindu) आणि मुस्लिमांचे (muslim) पूर्वज एकच होते...' हा RSS चे सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांना साक्षात्कार आहे की दृष्टांत. मग आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का? असा सवाल संभाजी बिग्रेडने ( sambhaji brigade) उपस्थितीत करत जोरदार घणाघात केला आहे. मोहन भागवत यांनी सोमवारी मुंबईत ग्लोबल स्टेटर्जिक पॉलिसी (Global Strategic Policy) या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या 'राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी' या विषयावर आपली भूमिका मांडली. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील उच्चविभूषित व्यक्तींना बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या भूमिकेवर संभाजी बिग्रेडने सडकून टीका केली आहे.  संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी एक पोस्ट लिहून संघाला थेट सवाल विचारला आहे. RSS चे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात... 'हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते...' हा साक्षात्कार आहे की दृष्टांत. मग ज्या आरएसएस आणि हिंदुत्ववादी विचारांनी आजपर्यंत हिंदू-मुस्लीम वाद लावून दंगली का घडवल्या, समाजात समाजात सामाजिक तणाव निर्माण करून वातावरण गढूळ का केले? हजारो मुलांचे या धार्मिक दंगलीत जीव गेले मग त्यांना आजपर्यंत का भडकवले गेलं? असा सवाल शिंदेंनी विचारला. Mumbai Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ इथे होणार भरती; करा अर्ज तसंच, 'हजारो लोकांचे संसार देशात उद्ध्वस्त केले. कुणाला कोणता धर्म स्वीकारायचा हा अधिकार कायद्याने प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे' असंही शिंदे म्हणाले. 'हिंदू मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. तर आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का! मुळात यांना एवढ्या उशिरा हा शोध लागलाच कसा.  भागवत साहेब, आरएसएसचा 'सरसंघचालक' मुस्लिम बनवून दाखवा. राजकारण करण्यासाठी धर्म आडवा येत असेल तर RSS च्या सरसंघचालक पदी 'महिला' बनवून दाखवा' असं आव्हानच शिंदेंनी संघाला दिलं. काय सांगता? कोरोना होऊन गेलेल्यांना लस घेण्याची गरजच नाही? जाणून घ्या सविस्तर 'धर्माचं परत राजकारण करू नका. कारण का बाबरी पाडली? का लोकांची घरं जाळली? का हे फक्त सुडाच्या राजकारणातून सत्तेचे राजकारण साधण्याचा प्रकार होता, हे भागवतांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे. तुमच्या या वागण्यामुळेच, निवडणुकीच्या काळात देश संकटात येतो. दहशतवादी हल्ले होतात आणि निवडणुकीत भावनिक राजकारण करून धर्मांध राजकारणी सत्तेची पोळी भाजून घेतात. धर्माचं राजकारण करून सत्तेवर यायचं आणि सत्तेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे पूर्वज एकच आहेत हे सांगायचं हा खोटारडेपणा आहे. धर्मांध राजकारण करून आजपर्यंत धर्माधर्मात वाद कोणी वाद लावले. धर्माधर्मात दंगली कोणी घडवल्या? कुणा मुळे 'हिंदू खतरे में हैं...' होता. हे भागवतांना सांगणार कोण? असंही शिंदे म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या