मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /काय सांगता? कोरोना होऊन गेलेल्यांना लस घेण्याची गरजच नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

काय सांगता? कोरोना होऊन गेलेल्यांना लस घेण्याची गरजच नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

 ज्या नागरिकांना कोरोना (Corona) होऊन गेला आहे, त्यांना कोरोना प्रतिबंधक लस (Anti covid vaccine) घेण्याची गरजच नसल्याचं मत काही तज्ज्ञांनी (Expert) व्यक्त केलं आहे.

ज्या नागरिकांना कोरोना (Corona) होऊन गेला आहे, त्यांना कोरोना प्रतिबंधक लस (Anti covid vaccine) घेण्याची गरजच नसल्याचं मत काही तज्ज्ञांनी (Expert) व्यक्त केलं आहे.

ज्या नागरिकांना कोरोना (Corona) होऊन गेला आहे, त्यांना कोरोना प्रतिबंधक लस (Anti covid vaccine) घेण्याची गरजच नसल्याचं मत काही तज्ज्ञांनी (Expert) व्यक्त केलं आहे.

मुंबई, 7 सप्टेंबर : ज्या नागरिकांना कोरोना (Corona) होऊन गेला आहे, त्यांना कोरोना प्रतिबंधक लस (Anti covid vaccine) घेण्याची गरजच नसल्याचं मत काही तज्ज्ञांनी (Expert) व्यक्त केलं आहे. कोरोना होऊन गेल्यामुळे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्याच अँटिबॉडिज (Antibodies) तयार झालेल्या असतात. लसीमार्फत मिळणाऱ्या अँटिबॉडिजपेक्षा शरीरात तयार झालेल्या नैसर्गिक अँटिबॉडिज या अधिक परिणामकारक असतात. त्यामुळे एकदा कोरोना होऊन गेला असेल, तर लस घेण्याची गरजच नसल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती

कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमधील प्रतिकारशक्ती ही लस घेतलेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक असते, असा दावा काही अभ्यासकांनी केला आहे. मात्र याची खातरजमा अद्याप झाली नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. अमेरिकेत 10 कोटींपेक्षाही अधिक नागरिक कोरोनाने प्रभावित झाले होते. त्यातील बहुतांश नागरिक हे नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचं समर्थन करत आहेत. तर 12 कोटी 60 लाख अमेरिकन नागरिकांनी अद्यापही लसच घेतली नसल्याचं समोर आलं आहे.

इस्त्रायलमधील संशोधन

इस्त्रायलमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनातून एक वेगळाच निष्कर्ष पुढं आला आहे. कोरोना होऊन गेलेल्या आणि एकही लस न घेतलेल्या व्यक्ती या कोरोना न होता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींपेक्षा अधिक चांगली इम्युनिटी असणारे असतात, असं या संशोधनातन पुढं आलं आहे. लस टोचून वाढणाऱ्या अँटिबॉडिजचं प्रमाण, आयुष्य आणि परिणामकारकता ही नैसर्गिक अँटिबॉडिज तयार होणाऱ्यांच्या तुलनेत कमी असल्याचं सिद्ध झालं आहे.

शास्त्रज्ञांमध्ये मतभेद

नैसर्गिकरित्या तयार झालेल्या अँटिबॉडिज किती काळ टिकतात, याबाबतही शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. कोरोना होऊन गेला असेल, तर शरीरात अँटिबॉडिज तयार होतात. मात्र त्यानंतर त्या किती काळ टिकतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. याबाबत अद्याप कुठलंही ठोस संशोधन समोर आलेलं नाही.

हे वाचा - समाधी घ्यायला महिला उतरली गंगेत, भक्तांनी सुरु केलं भजन, पोलिसांची धावपळ

सर्वोत्तम उपाय

कोरोना होऊन गेल्यामुळे शरीरात ज्या अँटिबॉडिज तयार होतात, त्याची परिणामकारकता कोरोना प्रतिबंधक लसींमुळे वाढत असल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती आणि लस यांचं मिश्रण असलेली व्यक्ती ही भविष्यात कोरोनापासून अधिक सुरक्षित राहू शकेल, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.

First published: