मराठी बातम्या /बातम्या /पुणे /...तर दत्तात्रेय भरणेंनी राजीनामा द्यावा, शिवसेनेच्या नेत्याची थेट मागणी

...तर दत्तात्रेय भरणेंनी राजीनामा द्यावा, शिवसेनेच्या नेत्याची थेट मागणी

'माणसाचा बुद्धी आणि मन जर का जागेवर नसते, मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं ते तोंडावरती बाहेर येते'

'माणसाचा बुद्धी आणि मन जर का जागेवर नसते, मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं ते तोंडावरती बाहेर येते'

'माणसाचा बुद्धी आणि मन जर का जागेवर नसते, मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं ते तोंडावरती बाहेर येते'

पिंपरी चिंचवड, 15 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (ncp mla dattatray bharane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल भर सभेत अपशब्द वापरल्यामुळे शिवसेना (shivsena) कमालीची नाराज झाली आहे. 'जर दत्तात्रेय भरणे यांना आपल्या वक्तव्याचा जरा देखिल खेद असेल तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा' अशी मागणीही शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी केली.

पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या विधानाबद्दल विचारले असता नीलम गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पेट्रोलचं बील पाहून रिचा चड्ढा झाली थक्क; Photo सोशल मीडियावर व्हायरल

'माणसाचा बुद्धी आणि मन जर का जागेवर नसते, मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं ते तोंडावरती बाहेर येत, अस दत्ता भरणे यांचं झालं आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली ते मंत्री म्हणून काम करत आहेत, त्यांच्या विषयी जर कुणी असं बोलत असेल तर ते अत्यंत अयोग्य आहे' अशी नाराजी गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

तसंच, दत्तात्रेय भरणे यांना आपल्या वक्तव्याचा जरा  देखिल खेद वाटत असेल तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीच नीलम गोऱ्हे यांनी केली.

आधी बोलले, नंतर दिलगिरी!

15 ऑगस्टच्या निमित्ताने सोलापूर महापालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना दत्तात्रेय भरणे यांनी 'मुख्यमंत्र्यांचे जाऊ द्या, मरू द्या, आपण आपलं करूया ना. मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी घ्यायचा आहे' असं वक्तव्य भरणे यांनी भर व्यासपीठावर केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

...तर पुन्हा Lockdown; निर्बंध हटवल्याच्या पहिल्याच दिवशी CM ठाकरेंनी दिला इशारा

आपल्या विधानामुळे खळबळ उडाल्यामुळे भरणे यांनी तातडीने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून दिलगिरी व्यक्त केली. 'तो कार्यक्रम तिथे घेतला होता. मी कार्यक्रमाला पोहोचले पण महापौरांना येण्यास उशीर झाला. मी बोलत असताना ४३ एकरामध्ये चांगला बगीचा तयार केला जात आहे. महापौरांनी निधीची मागणी केली होती. तातडीने एक कोटींचा निधी दिला जाणार आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे, पण काही माध्यमांनी मुद्दामहुन माझ्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास केला. माझ्या विधानामुळे कुणाचे मन दुखावले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत भरणे यांनी भावना व्यक्त केली.

First published:
top videos