महाराष्ट्र सरकारनं कोरोना नियम काही प्रमाणात शिथील केले आहेत. त्यानुसार मॉल, रेस्टॉरंट, दुकानं, गार्ड, बीच, लोकल काही अटींसह सुरू केले आहेत.
2/ 9
शॉपिंग मॉल, जिम, हॉटेल, स्पा आणि दुकानांना कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतलेली असेल या अटीवर रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
3/ 9
इनडोअर गेम्सना परवानगी असेल, परंतु पुढील आदेश येईपर्यंत सिनेमा हॉल आणि प्रार्थनास्थळे बंद राहतील.
4/ 9
मोकळ्या जागी होणाऱ्या लग्नांमध्ये 200 लोकांना सहभागी होण्याची परवानगी आहे तर बंद हॉलमध्ये 100 लोकं किंवा कार्यक्रम स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकं सहभागी होऊ शकतील.
5/ 9
कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
6/ 9
याचदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. लोकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
7/ 9
"आपण आता नियम शिथील करत आहोत पण कोरोना पूर्णपणे गेला नाही, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. जर कोरोना केसेस पुन्हा वाढले तर पुन्हा लॉकडाऊन लागू कऱण्याशिवाय दुसरा पर्याय नाही", असं मुख्यमंत्री म्हणाले.
8/ 9
शाळा आणि कॉलेज पुन्हा सुरू करण्याबाबत राज्याच्या कोविड टास्क फोर्सचा विरोध आहे. याबाबत उद्या बैठक होणार आहे आणि त्यात अंतिम निर्णय होईल.
9/ 9
डॉक्टर्स, तज्ज्ञ आणि सरकारी विभागांकडून वेगवेगळे सूचना मागवून त्यानुसार नवीन गाइडलाइन्स तयार केल्या जात आहेत.