मुंबई 16 ऑगस्ट: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. (Coronavirus in India) उद्योगधंद्यांचे तीन-तेरा वाजले आहेत. लाखो लोक बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीत आता इंधनाचे भाव देखील गगनाला भीडले आहेत. अन् याचा फटका आता सर्वसामान्य लोकांसोबतच सेलिब्रिटींना देखील पडू लागला आहेत. (Petrol price in India) असाच काहीसा अनुभव अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) हिने व्यक्त केला. तिने तर चक्क पेट्रोलचं बीलच सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
रिचा चड्ढाने नुकतेच आपल्या गाडीत पेट्रोल भरले. या पेट्रोलसाठी तिला तब्बल 7 हजार 855 रूपये भरावे लागले. परिणामी तिने “मी गाडीत नुकताच पेट्रोल भरले. गाडीची टाकी फूल करण्यासाठी मला 7855 रुपये मोजावे लागले” अशा आशयाचं ट्विट करत हे बील सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तिच्या या ट्विटवर सध्या देशभरातील नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
खणाच्या साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य; सोनालीच्या नव्या फोटोंवर चाहते फिदा
देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा भाव 101.84 रुपये आणि डिझेलचा भाव 89.87 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव 107.83 रुपये आणि डिझेलचा भाव 98.45 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव 102.08 रुपये आणि डिझेलचा भाव 93.02 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोलचा भाव 102.49 आणि डिझेलचा भाव प्रति लिटर 94.39 रुपये आहे. तामिळनाडुत पेट्रोलचे दर कमी झाल्याने आता महाराष्ट्रातील जनताही राज्य सरकारकडे आस लावून बसली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Richa chadha