मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

संचारबंदीमुळे पुण्याहून गावी निघाले दोघे भाऊ; मात्र काळाने घातला घाला

संचारबंदीमुळे पुण्याहून गावी निघाले दोघे भाऊ; मात्र काळाने घातला घाला

कोरोना संचारबंदीमुळे कंपन्यांनी काम बंद केलं आहे.

कोरोना संचारबंदीमुळे कंपन्यांनी काम बंद केलं आहे.

कोरोना संचारबंदीमुळे कंपन्यांनी काम बंद केलं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

अक्कलकोट, 19 एप्रिल : पुण्याहून गावाकडे येताना दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोना संचारबंदीमुळे कंपन्यांनी काम बंद केलं आहे. त्यात खानावळी बंद असल्याने पंकज आणि राहुल देसाई या दोघांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला होता.

शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास काळेवाडी-औंध रस्त्यावर दुचाकी गतिरोधकावरुन उडाल्याने केगाव येथे दोघा चुलत भावांचा मृत्यू झाला. पंकज इरप्पा देसाई (वय 27) आणि राहुल सिद्धाराम देसाई (वय 25) अशी या दोघांची नावे आहेत.

पंकज देसाई हा मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. तर राहुल याचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. तो व पंकज पुण्यातील एका खासगी कंपनी काम करीत होते.

हे ही वाचा-PSIचे लज्जास्पद कृत्य, हवालदार प्रेयसीसोबत मिळून पत्नीला मारहाण

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे कंपन्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यातच गावी मित्राचं लग्न असल्याने ते दोघे केगावला परतत होते. शनिवारी दोघेही पुण्याहून दुचाकीवरुन निघाले. त्यात दुचाकी गतिरोधकावरुन उडाल्यामुळे दोघेही जोरात खाली कोसळले. रविवारी सायंकाळी साधारण सातच्या सुमारास दोघांवर केगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

First published:

Tags: Accident, Pune