हवालदार प्रेयसीसोबत मिळून PSIची पत्नीला बेदम मारहाण, औरंगाबादमधील घटनेने खळबळ

हवालदार प्रेयसीसोबत मिळून PSIची पत्नीला बेदम मारहाण, औरंगाबादमधील घटनेने खळबळ

Aurangabad PSI, woman constable suspended: पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने प्रेयसीसोबत मिळून पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 18 एप्रिल: औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad district) एक वेगळीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलीस उपनिरीक्षक पदावर (Police Sub Inspector) कार्यरत असलेल्या शैलेश जोगदंड याने हवालदार असलेल्या आपल्या प्रेयसीसोबत मिळून पत्नीला बेदम मारहाण (wife beaten) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पीएसआय पती आणि हवालदार असलेल्या त्याच्या प्रेयसीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शैलेश जोगदंड हा देवगाव रंगारी येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. त्याचा विवाह काहीवर्षांपूर्वी झाला होता. मात्र, असे असतानाही त्याचे औरंगाबाद पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका 29 वर्षीय हवालदार महिलेसोबत प्रेमसंबंध होते. शैलेश जोगदंड याचा आपल्या पतीसोबत वारंवार वाद होत असे.

वाचा: NCBची मोठी कारवाई; एमडी ड्रग्ज, गांजासह 20 लाखांची रोकड जप्त

शुक्रवारी शैलेश जोगदंड याची हवालदार असलेली प्रेयसी पीडित महिलेच्या घरी आली. यावेळी शैलेश आणि हवालदार प्रेयसी या दोघांनी मिळून शैलेशच्या पत्नीला बेदम मारहाण केली. हवालदार प्रेयसीने घरात तोडफोड सुद्धा केली. यावेळी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचं म्हणताच शैलेश जोगदंड याने पुन्हा तिला बेदम मारहाण केली.

यानंतर दुपारच्या सुमारास पीडित महिलेने पती शैलेश जोगदंड आणि त्याची प्रेयसी या दोघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत दोघांच्या विरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी पीएसआय शैलेश आणि त्याची प्रेयसी असलेली हवालदार तरुणी या दोघांनाही तडकाफडकी निलंबित केलं आहे.

Published by: Sunil Desale
First published: April 18, 2021, 6:59 PM IST

ताज्या बातम्या