• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • घरात घुसणे जीवावर बेतले, नागरिकांनी केलेल्या मारहाणीत चोराचा मृत्यू

घरात घुसणे जीवावर बेतले, नागरिकांनी केलेल्या मारहाणीत चोराचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमधील भोसरीमध्ये गावठाण परिसरातील घटना घडली.

  • Share this:
पिंपरी चिंचवड, 18 ऑगस्ट : चोरी करणाच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तरुणाला नागरिकांनी बांधून बेदम मारहाण केली होती. या घटनेत चोराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरीमध्ये  गावठाण परिसरातील घटना घडली. भोसरीतील एका सोसायटीत हा तरुण चोरी करण्यासाठी आला होता. सोसायटीतील एका घरात हा चोर घुसला होता.  ही बाब तिथं राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी या तरुणाला पकडले आणि विचारपूस केली. पण, नंतर वाद विकोपाला गेला. लोकांनी या तरुणाला मारहाण करत बांधून ठेवले. बांधल्यानंतरही या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. मराठवाड्याला लवकरच मिळणार खूशखबर, पैठणमधून येणार आनंदाची बातमी! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण गर्दुला होता. नागरिकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झाला होता. काही स्थानिकांनी या घटनेची भोसरी पोलिसांना दिली. भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आई...ए आई! तरुणाची ही हाक ठरली अखेरची, माऊलीच्या डोळ्यासमोरच लेकाचा करुण अंत या तरुणाला नागरिकांनी बांधले होते पण मारहाणीमुळे मृत्यू झाला का याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे करत आहे.
Published by:sachin Salve
First published: