आई...ए आई! तरुणाची ही हाक ठरली अखेरची, माऊलीच्या डोळ्यासमोरच लेकाचा करुण अंत

आई...ए आई! तरुणाची ही हाक ठरली अखेरची, माऊलीच्या डोळ्यासमोरच लेकाचा करुण अंत

संपूर्ण नाशिक हादरून सोडणारी घटना येथील दिंडोरी भागात घडली. जेव्हा एका आईला दिलेली लेकाची हाक शेवटची ठरली.

  • Share this:

नाशिक, 18 ऑगस्ट : संपूर्ण नाशिक हादरून सोडणारी घटना येथील दिंडोरी भागात घडली. जेव्हा एका आईला दिलेली लेकाची हाक शेवटची ठरली. दिंडोरी येथील एका तरुणाचा तोल जाऊन बाल्कनीतून खाली पडल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशाल शिवाजी कोरडे असे या मृत तरूणाचे नाव आहे.

विशाल हा नाभिक समाजाचा युवा कार्यकर्ता असून सकाळी पाणी आल्यानंतर तो रो हाऊसवर असलेल्या टाकीत पाणी सोडण्यासाठी गेला. टाकी भरल्याचे कळताच त्यानं आईला आवाज दिला, त्याच वेळी बाल्कनीच्या टोकावर उभ्या असलेल्या विशालचा तोल गेला आणि तो खाली कोसळला.

वाचा-वेगळी शेती, वेगळी घरं तरीही दोन भावांचे पटेना; संतापलेल्या मोठ्या भावानेच...

काही तरी जोरात खाली पडल्याचा आवाज आल्यानं विशालच्या घरातली मंडळी बाहेर आली. तेव्हा त्यांना विशाल खाली पडलेला दिसून आला. उंचावरून खाली पडल्यामुळे विशालच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. कुटुंबियांनी त्याला तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यानच विशालचा मृत्यू झाला.

वचा-तरुणीची आत्महत्या नाहीतर खून, एवढ्याच रिपोर्टवरून पोलिसांनी तरुणाला पकडले

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माऊलीच्या डोळ्यादेखत झालेल्या या घटेनमुळे संपूर्ण परिसरात केवळ आक्रोश होता.

Published by: Priyanka Gawde
First published: August 18, 2020, 8:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading