पुणे, 08 ऑगस्ट : राज्यात चोरीच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशात देवीचा कळस चोरीला गेल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील शिरुर शहरात असलेल्या रेणुकामाता मंदिराचा कळस चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. मात्र, शिरुर पोलीस स्टेशनच्या तपासपथकाने व स्थानिक युवकांच्या मदतीने आरोपी चोरी गेलेल्या कळसासह अवघ्या दोन तासांत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी प्रशांत आबा म्हस्के (रा.बाबुरावनगर,शिरुर) या आरोपीस कळस चोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 6) रोजी राञीच्या सुमारास शिरुर शहरानजीक डोंगरावर असलेल्या रेणुकामाता मंदिराचा कळस चोरी गेल्याबाबत शिरुर पोलिसांना माहिती मिळाली होती.
कोरोनाच्या संकटातही या राज्यात सुरू होती पाकिस्तानी घुसखोरी, BSF ने केलं ठार
घडलेल्या प्रकाराचे गांभिर्य लक्षात घेत शिरुर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी वेगाने सुञे हलवत घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांना माहिती देत तपास सुरू केला. यावेळी स्थानिकांनी सदर आरोपीस हटकले असल्याची माहिती पोलिसांना दिली.
राष्ट्रवादी आमदारांच्या लहान भावाचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.