Home /News /maharashtra /

राष्ट्रवादी आमदारांच्या लहान भावाचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

राष्ट्रवादी आमदारांच्या लहान भावाचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    प्रविण तंडेकर, प्रतिनिधी भंडारा, 08 ऑगस्ट :  राष्ट्रवादीचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचे लहान भाऊ बालू (रामेश्वर) कारेमोरे यांचे रात्री अपघाती निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ते वरठी इथल्या राईस मिल इथून आपल्या कारने घरी जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बालू कारेमोरे हे रात्री कारने घरी जात असताना ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालू यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवला असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. राज्यात आजही होणार मुसळधार पाऊस, वाचा काय आहे हवामान खात्याचा अंदाज सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अपघाती ट्रकलादेखील ताब्यात घेतलं आहे. अपघात नेमका कसा झाला याचा पोलीस तपास करत असून प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर भर रस्त्यात अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी अपघाती वाहनं रस्त्याच्या कडेला केली असल्याची माहिती देण्यात आहे. कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 दिवसांत होणार निर्णय दरम्यान, बालू यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कारेमोरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या अपघाचा पुढील तपास करत असून शवविच्छेदनानंतर बालू यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या