बाडमेर, 08 ऑगस्ट : संपूर्ण जगात कोरोनाचं सावट आहे. प्रत्येक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. पण अशात पाकिस्तानच्या कुरापती मात्र सुरू आहेत. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाखासर पोलीस स्टेशन (Bakhasar police station) परिसरातील बीकेडीजवळ रात्री उशिरा घुसखोरीचा मोठा प्रयत्न बीएसएफ जवानांनी उधळून लावला आहे. पाकिस्तानचा एक तरुण रात्री उशीरा 1 वाजण्याच्या सुमारास भारतीय हद्दीत प्रवेश करण्याच्या तयारीत होता.
तरुण बॅरिकेडजवळ पोहोचताच बीएसएफकडून त्याला चेतावणी देण्यात आली. परंतु त्यानंतरही त्याने ऐकलं नाही. बीएसएफकडून सतत इशारा देण्यात आला पण तरी तरुण हा काटेरी बॅरिकेटजवळ पोहोचला. यानंतरही बीएसएफच्या जवानांनी त्यांना इशारा दिला. पण तरीही तो मागे हटला नाही आणि बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी आमदारांच्या लहान भावाचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू
राज्यात आजही होणार मुसळधार पाऊस, वाचा काय आहे हवामान खात्याचा अंदाज
माहिती मिळाल्यानंतर, बाखासर ठाणाधिकारी सीओ चौहाननही घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर पाकिस्तानने आपल्या नागरिकाचा मृतदेह ताब्यात घ्यावा, अशी माहिती पाकिस्तानला देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पाकिस्तान हा मृतदेह ताब्यात घेणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajasthan