जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणे-सोलापूर महामार्गावर टँकरचा भीषण अपघात; केमिकलनं भरलेला टँकर पलटी

पुणे-सोलापूर महामार्गावर टँकरचा भीषण अपघात; केमिकलनं भरलेला टँकर पलटी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

पुणे -सोलापूर महामार्गावर केमिकलनं भरलेल्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 18 जुलै : पुणे -सोलापूर महामर्गावर केमिकलनं भरलेल्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे. उरुळी कांचनमधील एलाईट चौकात केमिकलनं भरलेला टँकर पटली झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा टँकर पलटी झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र महामार्गाच्या बाजुला असलेल्या दोन दुकानांचं मोठ नुकसान झालं आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नियंत्रण सुटल्यानं अपघात   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात घडला असून, उरळी कांचनमधील एलाईट चौकात केमिकलने भरलेला टँकर पलटी झाला आहे. पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने हा केमिकलने भरलेला टँकर निघाला होता. वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजक तोडून टॅंकर सर्व्हिस रोडवर पलटी झाला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक कोंडी  दरम्यान रस्त्यावरच टँकर पलटी झाल्यानं काही काळ या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. काही वेळेनंतर पुन्हा वाहनांचा प्रवास सुरळीत सुरू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात