जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune News : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, वऱ्हाडाचा टेम्पो पलटी, 13 जण गंभीर जखमी

Pune News : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, वऱ्हाडाचा टेम्पो पलटी, 13 जण गंभीर जखमी

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लग्नासाठी गेलेल्या वऱ्हाडाचा टेम्पो उलटून हा अपघात घडला.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 12 जून, रायचंद शिंदे : जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लग्नासाठी गेलेल्या वऱ्हाडाचा टेम्पो उलटून हा अपघात घडला. या अपघातामध्ये 13 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पोचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला आहे. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लग्नावरून परतत असताना अपघात घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  लग्नासाठी गेलेलं वऱ्हाड विवाहसोहळा आटपून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. पुणे- नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर बाह्यवळनावर हा भीषण अपघात झाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या टेम्पोमध्ये तीस ते पस्तीस वऱ्हाडी होते. हा टेम्पो पुणे- नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर परिसरात आला असता टेम्पोचं टायर फुटलं. टायर फुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि टेम्पो पलटी झाला.

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; हज यात्रेसाठी निघाले होते कुटुंब, पण वाटेतच..

जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश   या टेम्पोमधून सुमारे तीस ते पस्तीस वऱ्हाडी प्रवास करत असल्याची माहिती आहे. टेम्पोचं चाक फुटल्यानं टेम्पो उलटला. या अपघातामध्ये सुमारे तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. अपघातामधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात