जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; हज यात्रेसाठी निघाले होते कुटुंब, पण वाटेतच..

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; हज यात्रेसाठी निघाले होते कुटुंब, पण वाटेतच..

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. हज यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 11 जून, अविनाश कानडजे : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. हज यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कॉरिडॉरजवळच्या दुभाजकामध्ये उलटली. कारचं टायर फुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. चिमुकल्याचा मृत्यू  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हज यात्रेसाठी मुंबईहून संभाजीनगरच्या दिशेनं जात असताना समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळ हा कारचा अपघात झाला. या घटनेत अख्तर रझा हा एक वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला तर अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त खान कुटुंब हे मुळ बिहार राज्यातील छप्रा येथील रहिवासी असून, ते  सध्या वाशी, मुंबई येथे स्थायिक झाले आहे.  17 जून रोजी जाणार होते हज यात्रेला  गया येथून 17 जून रोजी ते विमानाने हज यात्रेसाठी जाणार होते. त्यासाठी ते आपल्या गावी छप्रा येथे जात होते. समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना जांबरगाव, लासुरगाव दरम्यान चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार  दुभाजक ओलांडून दुसऱ्या कॉरिडॉरजवळच्या दुभाजकामध्ये उलटली. गाडीचे टायर फुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून, चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात