जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / 24 तासांत जाहिरात बदलावी लागली कारण... सुप्रिया सुळेंचा शिंदेंना खोचक टोला

24 तासांत जाहिरात बदलावी लागली कारण... सुप्रिया सुळेंचा शिंदेंना खोचक टोला

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या लोकप्रियतेच्या सर्व्हेची जाहिरात मंगळवारी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. यावरून सुप्रिया सुळे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जून :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या लोकप्रियतेच्या सर्व्हेची जाहिरात मंगळवारी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये  मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीसांना 23.2 टक्के मतं लोकांनी दिलेत. मात्र आज पुन्हा एकदा सुधारीत जाहिरात छापण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी खोचक टोला लगावला आहे. 42 टक्के लोक यांच्या बाजूने आहे, याचा अर्थ जास्त लोक विरोधात आहेत, आज जाहिरात बदलावी लागली कारण त्यामागे दिल्लीचा अदृश्य हात आहे. 24 तासांत जाहिरात बदलावी लागली असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना फडणवीसांना देखील टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांचा अपमान झाला आहे, आमचे विरोधक असले तरी शिंदे गटानं त्यांचा अपमान केला आहे. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray : शिवतीर्थावर पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी चांगलंच सुनावलं, मध्यरात्री नेमकं काय घडलं? Video

दरम्यान आळंदीमध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला असा आरोपीही करण्यात येत आहे. यावर बोलताना या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. काय आहे सर्व्हेमध्ये? महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या सर्वेक्षणात, राज्यातील जनतेने पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्याचं पाहायला मिळतंय. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात भाजपला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने कौल दिलाय.. महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनतेने भाजप आणि शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी पसंती दर्शवलीय, तसंच मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीसांना 23.2 टक्के मतं लोकांनी दिलेत. शिंदे-फडणवीस जोडीला एकूण 49.3 टक्के जनतेने पसंती दर्शवल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय. दरम्यान या सर्व मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेनं मला आणि फडणवीसांना पसंती दिली असून आता आमची जबाबदारी वाढल्याचं म्हटलंय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , NCP , Supriya sule
  • First Published :
जाहिरात
जाहिरात