जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / सुप्रिया सुळेंनी मोडला पवारांचा नियम, मटण खाऊन मंदिरात गेल्याचा शिवसेनेचा आरोप

सुप्रिया सुळेंनी मोडला पवारांचा नियम, मटण खाऊन मंदिरात गेल्याचा शिवसेनेचा आरोप

सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असं म्हणत शिवतारे यांनी  एक व्हिडीओ पोस्ट केला

सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असं म्हणत शिवतारे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला

सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असं म्हणत शिवतारे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 05 मार्च : राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही आणि कोण कुणावर कुठला आरोप करेल याचा काही अंदाज नाही. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मटन खाऊन मंदिरात गेल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असं म्हणत शिवतारे यांनी  एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे या दोन तरुणांशी संवाद साधत आहे. एका हॉटेलमधला हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही तरुणांनी मटन थाळी ऑर्डर केली होती, यावेळी, सुप्रिया सुळे यांनी या तरुणांशी बोलताना आपण सुद्धा अशीच थाळी खाली असं म्हटलं आहे. (ईडीची पिडा, हसन मुश्रीफ यांची हायकोर्टाने धाव) हाच धागा पकडून शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांनी मटण थाळी खाऊन महादेव आणि सासवडला सोपणकाका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पुण्यातील एका हॉटेलमध्ये आज मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केलं, असा आरोप केला आहे. (‘त्या’ टीकेमुळे गुलाबराव पाटलांना आला राग, विरोधकांना एका वाक्यात सुनावलं) काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मटण खाल्यामुळे पुण्यातील दगडशेठ हलवाई मंदिरात जाण्यास टाळले होते. पण, आता सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन मंदिरात प्रवेश केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या या देवदर्शनावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात