जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ईडीची पिडा, हसन मुश्रीफ यांची हायकोर्टाने धाव

ईडीची पिडा, हसन मुश्रीफ यांची हायकोर्टाने धाव

  माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 05 मार्च : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी मुश्रीफ यांनी केली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने फसवणुकीच्या आरोपाखाली कोल्हापुरात गुन्हे दाखल केले आहे. हे गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ED हेतुपुरस्सर कारवाई करत असल्याचा याचिकेत दावा केला आहे. (रियल लाईफ नायक! मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना तंबी, दोन डॉक्टरांचं लगेच निलंबन, Video) जोपर्यंत याचिकेवर सुनावणी होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये आणि आरोपपत्रही दाखल करू नये असे पोलिसांना निर्देश देण्याचीही याचिकेत मागणी केली आहे. 23 फेब्रुवारीला,कोल्हापुरातील मुरगूड पोलीस ठाण्यात,मुश्रीफ यांच्या विरोधात विवेक कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा, राजकीय हेतूनं प्रेरित षड्यंत्र असल्याचं सांगून तो रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका ॲड प्रशांत पाटील यांच्या मार्फत मुश्रीफ यांनी दाखल केली आहे. मागील 6 ते 7 महिन्यांत घडलेल्या घटनांवरून स्पष्टपणे दिसून येते की मुश्रीफ यांना ईडीच्या खटल्यांमध्ये अडकवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत असल्याचा याचिकेत उल्लेख केला आहे. (शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सरळ सेवा भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ) दरम्यान, ईडीकडून पी चिदंबरम यांच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ कोर्टा समोर दिला आहे. ईडीने तपासात पुरेसं स्वातंत्र्य देण्याची मागणीही केली आहे. दोन वेळा समन्स देऊन देखील नाविद मुश्रीफ हे ईडी समोर चौकशीसाठी हजर न झाल्याचा ईडीकडून आरोप करण्यात आला आहे. नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष PMLA कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी दाखल अर्ज दाखल केला आहे. काय आहे प्रकरण? हसन मुश्रीफ यांची मुले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. प्राथमिक चौकशीत कारखान्याला मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे आणि या पैशाच्या स्त्रोताविषयी कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही. हा पैसा अवैध मार्गाने आल्याचे ईडीने म्हटले आहे. दरम्यान, हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांकडून वरिष्ठ वकील आबाद पोंडा आणि प्रशांत पाटील यांनी सत्र न्यायालयात बाजू मांडली. ईडीकडून हसन मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा मुख्य हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याविरोधात कोणतेही गैरव्यवहार केल्याचे समोर आले नसल्याचे सांगितले. ईडीने हे आरोप फेटाळून लावताना न्यायालयात दिशाभूल केली जात असल्याचे सांगितले. छापेमारी कायदेशीर मार्गाने झाल्याने ईडीने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात