Home /News /national /

धक्कादायक! केसगळतीमुळे डिप्रेशन; किशोरवयीन मुलीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

धक्कादायक! केसगळतीमुळे डिप्रेशन; किशोरवयीन मुलीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे आणि मनावर कळत नकळत झालेल्या आघातांमुळे DEPRESSION येऊ शकतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

    लखनऊ, 24 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर तो डिप्रेशनमध्ये (depression) असल्याचं समजलं. तो डिप्रेशनमध्ये का होता हे माहिती नाही, अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असू शकतात, त्याबाबत शक्यता वर्तवल्या जात आहेत. डिप्रेशनची अनेक कारणं आहेत. व्यक्तीनुसार ही कारणं वेगवेगळी असतात. नुकतीच उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक घटना समोर येते आहे, ज्यामध्ये एका मुलीला केसगळतीमुळे डिप्रेशन (girl depressed due to hairloss) आलं होतं. तिनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. लाइव्ह हिंदुस्तान.कॉमच्या वृत्तानुसार, बस्तीतल्या मुजेहना गावातील 16 वर्षांची साजिया खातून. केस गळत असल्याने ती खूप कालावधीपासून डिप्रेशनमध्ये होती. अखेर तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. घरात गळफास घेऊन तिनं आत्महत्या केली आहे. तिच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार साजियाने खूप डॉक्टरांचा सल्ला घेतला मात्र उपचाराचा काहीच फायदा झाला नाही. हळूहळू तिच्या डोक्याच्या मागील केस कमी खूप कमी झाले त्यामुळे ती तणावात होती. हे वाचा - लज्जास्पद! भररस्त्यात गळा चिरुन पत्नीची हत्या, जमाव VIDEO करीत विचारत होता... क्लिनिकल सायकॉजिस्ट प्रज्ञा माने यांनी सांगितल्यानुसार, नैराश्य हे आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे आणि मनावर कळत नकळत झालेल्या आघातांमुळे येऊ शकतं. बहुतेकदा ते उघड्या डोळ्यांना दिसत ही नाही. आपल्या समोर येणारी व्यक्ती कुठल्या मानसिक कलहातून जात आसेल याचा आपण विचारही करू शकत नाही. पण, एखाद्या व्यक्तीच्या आपण जवळून संपर्कात असू तर आपल्याला त्यामधील लहान लहान बदल सहज जाणवू शकतात. नैराश्यात मेंदूत रासायनिक बदल घडतात. त्यामुळे तो तितकाच 'खरा' आजार आहे. त्यावर गोळ्या (psychiatric medication) आणि समुपदेशन ( psychotherapy) हा उपाय आहे. डिप्रेशनची लक्षणं का आहेत? सतत दुःखी - विषण्ण वाटणं, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टीत मन न रमणं ही दोन नैराश्याची प्रमुख आणि लक्षात येणारी लक्षणं. काही घडलं आणि आपल्याला 2-4 दिवस असं वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण ही लक्षणे जर दोन आठवड्यांवर तशीच असतील तर आपलं नैराश्य ओळखण्याची ही पहिली पायरी. हे वाचा - इरफान खानच्या मुलाची चाहत्यांसाठी पोस्ट- 'नेपोटिझमचा बदला घ्या पण सुशांतला...' त्याच प्रमाणे शरीरात ताकद नसल्यासारखी वाटणं, खूप भूक लागणं- अजिबात भूक न लागणं, सारखं झोपावसं वाटणं - अजिबात झोप न येणं, भिती वाटणं, अपराधी वाटणं, लक्ष न लागणं, निराश- हताश वाटणं ही नैराश्याची इतर लक्षणं आहेत, अशी माहिती प्रज्ञा माने यांनी दिली. संकलन, संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Depression, Depression suicide

    पुढील बातम्या