कॅलिफोर्निया, 08 फेब्रुवारी : उत्तर अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील सॅन जोस शहरातील एक बागेतून हा पुतळा चोरीला गेला आहे. ग्वाडालुपे रिव्हर पार्क हा भाग प्रसिद्ध आहे या भागातून हा पुतळा गायब असल्याचे तेथील प्रशासनाने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी माहिती प्रसिद्ध केली आहे. हा पुतळा कधी चोरी करण्यात आला याबाबत अद्यापही कसलीच माहिती समोर आली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सॅन जोस पार्क विभागाकडून ट्वीटरद्वारे याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, 'ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला आहे. याबाबत माहिती सांगताना आम्हाला वाईट वाटत असल्याचे ते म्हणाले आहेत मात्र, हा पुतळा कधी चोरीला गेला? याबद्दल अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही.
We regret to inform our community that the Shri Chhatrapati Shivaji Maharaj statue at Guadalupe River Park is missing. If you have information regarding the missing statue, please report it to the non-emergency SJPD number at 408-277-8900. pic.twitter.com/DzVl8qTXmM
— San José Parks & Rec (@sjparksandrec) February 3, 2023
हे ही वाचा : अतिथी देवो भव! परदेशी महिला पर्यटकानं मानले टॅक्सी चालकाचे आभार, कारणही आहे खास
अमेरिकेतील सॅन जोश भगिणींना पुण्यातून हा महाराजांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेतील मराठा शासकाचा हा एकमेव पुतळा होता. या घटनेनंतर संपूर्ण शहरात तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, आम्ही पुतळ्याचा शोध घेत असून शक्य तितक्या लवकर पुतळा शोधू अशी पार्क प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी सुरू असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. 16 शेच्या शतकात इस्लामिक आक्रमकांविरुद्ध लढा दिला आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली.
हे ही वाचा : या ठिकाणी साधू डोक्यावर विस्तू ठेवून 18 वर्षं करतात तपश्चर्या, वाचा त्यांच्याविषयी
ते एक महान योद्धा तर होतेच पण त्यांचं शौर्य, रणनीती, कौशल्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी होतं. त्यांनी नेहमीच स्वराज्याच्या हितासाठी लढा दिला. मराठी वारसा टिकावा यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे त्यांचाच पुतळा चोरी गेल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, India america