मुंबई, 6 फेब्रुवारी : भारतीय संस्कृतीत अनेक गोष्टी अशा आहेत, ज्यामुळे परदेशी व्यक्ती आश्चर्यचकित होतात. आपल्या देशात ‘मातृदेवो भव’, ‘पितृदेवो भव’, ‘आचार्य देवो भव’, ‘अतिथी देवो भव’ असे संस्कार लहान वयापासून केले जातात. परदेशातून येणाऱ्या पाहुण्याला कुठलाही त्रास होऊ नये, याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. असाच काहीसा अनुभव आग्रा येथे स्पेन येथून भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आला. स्पेन येथील पर्यटकांना मोक्याच्या क्षणी मदत करणारी रेल्वे पोलिसांची यंत्रणा आणि एका टॅक्सी चालकाचा प्रामाणिकपणा एवढा भावला की या सर्वांचं कौतुक केल्याशिवाय त्यांना राहवलं नाही.
नेमकं काय घडलं?
स्पॅनिश रहिवासी असलेली अलेक्झांड्रा या दिल्लीहून 13 जणांच्या ग्रुपसोबत ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे आल्या होत्या. यादरम्यान त्यांनी आग्रा कॅन्ट येथून टॅक्सी केली होती, पण टॅक्सीमधून खाली उतरताना त्या गडबडीत त्यांच्याकडील पर्स टॅक्सीमध्येच विसरल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा स्टेशनवर येऊन रेल्वे पोलिसांना (जीआरपी) याबाबत माहिती दिली.
जीआरपीनं टॅक्सीचा नंबर ट्रेस करून टॅक्सी चालकाचा शोध घेतला. यानंतर जीआरपीनं टॅक्सीचालक महेश उपाध्याय यांना फोन करून स्थानकावर बोलावून घेतलं, व गाडीची तपासणी केली. या वेळी महिलेची पर्स टॅक्सीच्या सीटखाली सापडली. ज्याची माहिती टॅक्सी चालकालाही नव्हती. ही पर्स अलेक्झांड्रा यांना देण्यात आली.
एअर विस्ताराला एक नियम 70 लाखांना पडला; डीजीसीएने केली कारवाई, काय आहे प्रकरण?
महिलेनं मानले आभार
टॅक्सी चालक आणि जीआरपीनं परदेशी महिला पर्यटकाला परत केलेल्या पर्समध्ये काही डॉलर, पासपोर्ट, व्हिसा आणि आवश्यक कागदपत्रं होती. पर्स परत मिळाल्यानं महिलेला खूप आनंद झाला. त्यांनी पत्र लिहून जीआरपी आणि टॅक्सी चालकाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, या निमित्तानं या परदेशी महिला पर्यटकाला खऱ्या अर्थाने ‘अतिथी देवो भव’ चा अनुभव आल्याची चर्चा आग्रा आणि परिसरात सुरू आहे. खरं तर ‘अतिथी देवो भव’ याचा अर्थ जवळपास सर्वांनाच माहिती असतो. आपल्याकडे आलेले पाहुणे हे देवासमान असतात, असे आपल्याला लहानपणापासूनच शिकवले, सांगितले जाते. त्याचसोबत भारतात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ही ‘अतिथी देवो भव’ म्हटलं जातं. पण हे वाक्य केवळ एक स्लोगन किंवा पर्यटनाला चालना देणारी गोष्ट नाही. तर, त्यामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे.
कापलेली करंगळी हातात घेऊन ती पोहोचली पोलीस ठाण्यात; घटना ऐकून पोलीसही हादरले
आग्रा येथे परदेशी पर्यटकाच्या बाबतीत घडलेल्या प्रकारानंतर पुन्हा एकदा भारतीयांचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. परदेशी महिला पर्यटकानं लिहिलेलं आभार पत्र हा त्याचाच पुरावा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Spain, Uttar pardesh