मराठी बातम्या /बातम्या /देश /या ठिकाणी साधू डोक्यावर विस्तू ठेवून 18 वर्षं करतात तपश्चर्या, वाचा त्यांच्याविषयी

या ठिकाणी साधू डोक्यावर विस्तू ठेवून 18 वर्षं करतात तपश्चर्या, वाचा त्यांच्याविषयी

तपस्वी

तपस्वी

प्रयागराजमध्ये सध्या माघ मेळा सुरू आहे. त्यामुळे साधूसंतांचं नामस्मरण पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. देशभरातील साधू अनेक प्रकारे नामजप करतात. पण धुनी तपश्चर्येत साधूसंतांना विशेष आणि कठीण प्रसंगातून जावं लागतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    प्रयागराज, 6 फेब्रुवारी : प्रयागराजमध्ये सध्या माघ मेळा सुरू आहे. त्यामुळे साधूसंतांचं नामस्मरण पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. देशभरातील साधू अनेक प्रकारे नामजप करतात. पण धुनी तपश्चर्येत साधूसंतांना विशेष आणि कठीण प्रसंगातून जावं लागतं. या प्रक्रियेदरम्यान त्यांना कधी डोक्यावर तर कधी मांडीवर विस्तव ठेवावा लागतो. इतकंच नाही तर त्यांना 12-12 तास याच मुद्रेत बसावं लागतं. विशेष म्हणजे ही तपश्चर्या एक किंवा दोन दिवसांत नाही तर 18 वर्षांनी पूर्ण होते आणि ती सहा भागांत विभागलेली असते. साधू, संत ही तपश्चर्या वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतात. माघ मेळ्याच्या निमित्ताने तपस्वी नगरीत सुरू असलेली ही अनोखी तपश्चर्या पाहण्यासाठी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.

    18 वर्षं करावी लागते तपश्चर्या

    अयोध्येचे अखिल भारतीय श्री पंच तेराभाई त्यागीचे महंत राम संतोष यांनी सांगितलं, ``साधू, संत ही तपश्चर्या लोककल्याणाच्या उद्देशानं करतात. ही तपश्चर्या 18 वर्षांनी पूर्ण होते. जो साधू ही तपश्चर्या सुरू करेल त्याला ती 18 वर्षं करावी लागते. यात साधू पंचधुना तप, सप्तधुना तप, नंतर द्वादश धुना, कोट धुना आणि खापर धुना तप करतात. ही तपश्चर्या अग्निमातेच्या मध्यभागी बसून केली जाते. कधी मांडीवर अग्नी ठेवून तर कधी मातीच्या भांड्यात विस्तव ठेवून ते भांडं मस्तकावर ठेवून जप करतात. ``

    हेही वाचा - प्रभू रामांच्या मूर्तीसाठी देशातील प्रसिद्ध चित्रकार करणार रेखाटन, जाणून घ्या कसे असेल स्वरुप

    अग्निगृहात बसून केली जाते शोध तपश्चर्या

    तपस्वी नगरच्या खाक चौकात 200 हून अधिक साधू अग्नीगृहात बसून शोध तपश्चर्या करत आहेत. काही साधू-संत डोक्यावर मातीच्या भांड्यात अग्नी ठेवून नामजप करत आहेत. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला म्हणजे गंगा दशहऱ्याच्या दिवशी ही तपश्चर्या पूर्ण होईल. ``या दोन्ही तपश्चर्या रोज किमान 5 ते 12 तासांपर्यंत अग्निच्या सानिध्यात चालतात. त्यानंतर साधू आपली इतर कामं करतात. माघ मेळ्यादरम्यान जुना तपस्येचा संकल्प केल्यानंतर साधू सायंकाळपर्यंत ध्यानात तल्लीन असतात. गंगा दशहऱ्याच्या दिवशी हवन पूजन आणि धुनीचं गंगेत विसर्जन केलं जाणार आहे,`` असं महंत संतोष यांनी सांगितलं.

    नियम आहेत खूप कडक

    या साधनेबाबत साधूंनी सांगितलं की, ``या तपश्चर्येचे नियम खूप कडक आहेत. जर कोणत्याही कारणाने तपश्चर्या भंग झाली तर पुढच्या वर्षी नव्याने शांतपणे पुन्हा तपश्चर्या केली जाते. माघ मेळ्यात संगमाच्या पवित्र भूमीवर लोककल्याणासाठी ही तपश्चर्या करत आहोत.``

    First published:

    Tags: Lifestyle, Local18, Sadhu, Viral