जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune : कोरोनाच्या संकटामुळं दिव्यांगांना नैराश्याचा घेराव, भीक मांगो आंदोलन करत मांडल्या व्यथा

Pune : कोरोनाच्या संकटामुळं दिव्यांगांना नैराश्याचा घेराव, भीक मांगो आंदोलन करत मांडल्या व्यथा

Pune : कोरोनाच्या संकटामुळं दिव्यांगांना नैराश्याचा घेराव, भीक मांगो आंदोलन करत मांडल्या व्यथा

Pune Specially abled News सरकारनं दिव्यांग प्रवर्गासाठी कुठलीच मदत दिली नाही. सरकारला अनेक निवेदनं दिली. पण सरकारचं त्याकडं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं आंदोलनाचा पवित्रा घेत गुरुवारी आंदोलन करण्यात आलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 27 मे : कोरोनामुळं (Corona) लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या (Lockdown) पार्श्वभूमीवर राज्यभरातील दिव्यांगदेखिल (Specially Abled) मोठ्या अडचणीत आहेत. त्यांच्या मदतीसाठी सरकारने विशेष आर्थिक पॅकेज (Special Package) जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडं लक्ष वेधण्यासाठी पुण्यात भीक मांगो आंदोलन करण्यात आलं. दिव्यांग कल्याण आयुक्तालयासमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेनं आंदोलन केलं. (वाचा- होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय का घेतला? सरकारने जाहीर करावं - देवेंद्र फडणवीस ) प्रहार अपंग क्रांती संघटनेचे धर्मेंद्र सातव यांनी दिव्यांगांच्या व्यथा यावेळी मांडल्या. करोनाच्या संकटामुळं दीड वर्षापासून सातत्यानं लॉकडाऊन आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील दिव्यांग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक अपंग बांधवांचे  रोजगार गेले, अनेक दिव्यांगांनी सुरू केलेले लघु उद्योग बंद पडले. त्यामुळं आता दिव्यांगांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच दिव्यांग त्यात कोरोनामुळं आलेल्या नैराश्यानं दिव्यांग खचून गेले आहेत. हाती काम नाही, महागाईचा तडाखा यात जगणं मुशिकल झाल्याचं सातव म्हणाले. दिव्यांगांच्या सर्व अडचणी लक्षात घेऊन सरकारनं लॉक डाऊनच्या काळात जशी विविध घटकांसाठी मदत जाहीर केली तशीच अपंगांसाठीही द्यायला हवी होती. पण सरकारनं दिव्यांग प्रवर्गासाठी कुठलीच मदत दिली नाही. सरकारला अनेक निवेदनं दिली. पण सरकारचं त्याकडं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं आंदोलनाचा पवित्रा घेत गुरुवारी आंदोलन करण्यात आलं. (वाचा- पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, मंगळवारी बैठक ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना विशेष आर्थिक पँकेज देण्यासह राज्यातील जिल्हा व तालुकास्तरीय दिव्यांग समन्वय समित्या गठीत करणे आणि अस्तित्वात असणाऱ्या समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे, विशेष शाळांमधील विद्यार्थांच्या पालकांना अर्थसहाय्य करणे, तीन टक्के निधीमधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजनेसाठी खर्च करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात