मुंबई, 27 मे : पदोन्नतीतील आरक्षण (Reservation in Promotion) रद्द करण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Goverment) असलेले मतभेद पुन्हा पाहायला मिळाले आहेत. गुरुवारी काँग्रेसच्या मंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी (Varsha) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM
Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन यासंदर्भातील अध्यादेश मागे घेण्याची मागणी केली. यासंदर्भात मंगळवारी चर्चा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. या भेटीनंतर बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut)यांनी सरकारवर याचा परिणाम होणार नाही, असंही स्पष्ट केलं.
पदोन्नतीतील एससी-एसटी आरक्षण हटविण्याच्या मुद्यावर काँग्रेस नाराज आहे. या संदर्भातील अध्यादेश सरकारंन रद्द करावा अशी मागणी, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, नितीन राऊत आणि वर्षा गायकवाड या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली आहे. या विषयावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्यास सांगितलं असून त्यानंतर मुख्यमंत्री स्वत: बैठक घेणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधित अहवाल कायदा व न्याय विभागाकडं पाठवला आहे.
(वाचा -BREAKING : महाविकास आघाडीत वाद पेटला, काँग्रेस मंत्र्याचा अजित पवारांवर थेट आरोप)
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पदोन्नतीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. बैठकीत जीआर संदर्भात राऊत यांनी मुद्दा उपस्थित केला होता. पण त्यावर मंगळवारी स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल असं सांगण्यात आलं. त्यामुळं नंतर काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने 7 मे रोजी आरक्षण पदोन्नती संदर्भात अध्यादेश काढण्यात आला, यामध्ये आरक्षणा मधील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या जागा खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आल्याने काँग्रेस पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी वाढली आहे. काँग्रेसने स्वतःच्या सरकारवर यावरून टीकादेखिल केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करताना आम्हाला सत्ता प्रिय नाही, असे सूचक विधानही केले होते.
(वाचा-अरे देवा! ब्लॅक, व्हाइट, येलो आणि आता Cream Fungus; कोरोनानंतर बुरशीचं थैमान)
सरकारमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्यानं विरोधकांनाही या मुद्द्यावरून टीकेची आयती संधी मिळाली आहे. पदोन्नती आरक्षणाच्या अध्यादेश मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत दुटप्पी भूमिका घेतात, काही नेते त्याला विरोध करत आहेत तर काही समर्थन करत आहेत. एका सरकारमधील नेत्यांची अशी दुटप्पी भूमिका म्हणजे सगळं नाटक असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळं या मुद्द्यावरून आता सत्ताधारी पक्ष आमने-सामने उभे राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Nitin raut, Uddhav tahckeray, Varsha gaikwad