पुणे, 02 जुलै: सासू (Mother in Law) आणि जावयातील (Son in law) नातं आई आणि मुलाच्या नात्याप्रमाणे पवित्र मानलं जातं. पण पुण्यातील एका जावयानं या नात्याला कलंक फासला आहे. किरकोळ कारणातून त्यानं आपल्या सासूसोबत संतापजनक कृत्य केलं आहे. जावयानं सासूसोबत केलेलं किळसवाणं कृत्य पाहून पोलीसही चक्रावले आहेत. याप्रकरणी पीडित सासूबाईंनी आरोपी जावयाविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सोमवारी 28 जून रोजी पीडित सासूबाईनी आपल्या अहमदनगर येथे राहणाऱ्या जावयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपासून अहमदनगर येथील रहिवासी असणाऱ्या आरोपी जावयानं आपल्या सासूला व्यवसाय करण्यासाठी काही पैसे उसने दिले होते. पण बराच काळ उलटून गेला, तरी सासूनं जावयाचे पैसे परत दिले नाहीत. त्यामुळे सासूसोबतचा बदला घेण्यासाठी जावयानं संतापाच्या भरात आपल्या सासूच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला आहे. हेही वाचा- अल्पवयीन मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, पाहुणे आणि शेजाऱ्यांशी लैंगिक संबंधांची सक्ती, गर्भवती झाल्यामुळे प्रकरणाला वाचा जावयाच्या या संतापजनक कृत्यानंतर सासूनं हिंजवडी पोलीस ठाण्यात जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. किरकोळ कारणातून जावयानं सासूचा विनयभंग केल्यानं नातेवाईकांत संताप्त व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.