Home /News /crime /

अल्पवयीन मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, पाहुणे आणि शेजाऱ्यांशी लैंगिक संबंधांची सक्ती, गर्भवती झाल्यामुळे प्रकरणाला वाचा

अल्पवयीन मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, पाहुणे आणि शेजाऱ्यांशी लैंगिक संबंधांची सक्ती, गर्भवती झाल्यामुळे प्रकरणाला वाचा

घरमालकिणीनं आपल्या अल्पवयीन मोलकरणीला पाहुणे आणि शेजाऱ्यांशी जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडलं. ही मुलगी गर्भवती झाल्यानंतर ही घटना उघड झाली.

    जयपूर, 1 जुलै : एका श्रीमंत कुटुंबात मोलकरीण (maid) म्हणून कामाला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) मालकिणीकडून छळ आणि अन्याय (Harassment) झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. ही घऱमालकीण 14 वर्षांच्या या मोलकरणीला घरी येणाऱ्या पाहुण्यांसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध (Sexual relations) ठेवायला भाग पाडत असल्याचं या मुलीनं दिलेल्या जबानीतून स्पष्ट झालं आहे. या प्रकारातून ही मुलगी गर्भवती (Pregnant) राहिल्यामुळे प्रकरणाचा वाचा फुटली. याला विरोध केल्यावर अनन्वित अत्याचार केले जायचे आणि जबर मारहाण केली जात असल्याचंही तिनं सांगितलं आहे. ही घटना आहे राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील फतहनगरची. नूरजहां नावाच्या एका महिलेच्या घरी गेल्या 10 महिन्यांपासून काम करत होती. या काळात घरी येणाऱ्या अनेक पाहुण्यांसोबत आणि नातेवाईकांसोबत तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नूरजहां दबाव आणत असे. याला जेव्हा जेव्हा तिनं नकार दिला, तेव्हा तेव्हा तिला जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या खुणा आणि जखमांचे व्रण अजूनही तिच्या शरीरावर आहेत. अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती घरमालकिणीच्या इशाऱ्यावरून या मुलीचं सतत लैंगिक शोषण होत होतं. तिला बेल्टनं मारहणा केली जायची किंवा सुऱ्यानं तिच्या अंगावर जखमा केल्या जायच्या. जिवाच्या भीतीनं ही मुलगी घरमालकीण सांगेल ते निमूटपणे करत राहिली. एक दिवस शेजारी राहणाऱ्या छगन नावाच्या एका व्यक्तीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला तिला भाग पाडण्यात आलं. त्यानंतर ही मुलगी गर्भवती राहिली. सतत तब्येत बिघडू लागल्यामुळे या मुलीने घडलेला सगळा प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला आणि त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. तिची तपासणी केली असता मुलगी 4 महिन्यांची गर्भवती असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी फतहनगर पोलिसांत याची तक्रार दिली. हे वाचा -सेक्सटॉर्शन करुन मालामाल झाले गावकरी; 10 वर्षात केला गावाचा कायापालट पोलिसांनी सुरु केली कारवाई तक्रार देऊनही पोलीस केवळ जुजबी कारवाई करत असल्याचं मुलीच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. या प्रकऱणात पोलिसांनी आतापर्यंत एका व्यक्तीला अटक केली आहे. मात्र मुलीवर अत्याचार करणारी घरमालकीण नूरजहाँ आणि तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Girl pregnant, Rajasthan, Rape on minor, Sexual harassment

    पुढील बातम्या