मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुतण्याची हत्या केल्याने भोगला 10 वर्षांचा तुरुंगवास, सुटका होताच केली मेहुणीचीही हत्या

पुतण्याची हत्या केल्याने भोगला 10 वर्षांचा तुरुंगवास, सुटका होताच केली मेहुणीचीही हत्या

 पुतण्याच्या हत्येची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटलेल्या आरोपीने मेहुणीचीही हत्या (Criminal murders sister in law after getting out of jail) केल्याचं उघड झालं आहे.

पुतण्याच्या हत्येची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटलेल्या आरोपीने मेहुणीचीही हत्या (Criminal murders sister in law after getting out of jail) केल्याचं उघड झालं आहे.

पुतण्याच्या हत्येची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटलेल्या आरोपीने मेहुणीचीही हत्या (Criminal murders sister in law after getting out of jail) केल्याचं उघड झालं आहे.

  • Published by:  desk news

रायपूर, 14 ऑक्टोबर:  पुतण्याच्या हत्येची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटलेल्या आरोपीने मेहुणीचीही हत्या (Criminal murders sister in law after getting out of jail) केल्याचं उघड झालं आहे. आरोपी 10 वर्षांपूर्वी पुतण्याच्या (Jail in murder case of nephew) हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात गेला होता. आपल्या मेहुणीवरही त्याचा राग होता. जेलमधून सुटका झाल्यानंतर मेहुणीचा काटा काढण्याचा डाव त्याने आखला आणि संधी (Murder of sister in law) साधून तिची हत्या केली. मात्र पोलिसांनी जलद तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

मेहुणीवर होता राग

छत्तीसगडमधील रायगढ भागात दहा वर्षांपूर्वी जमिनीच्या वादातून पुतण्याची हत्या केल्यानंतर तुरुंगात गेलेल्या आरोपीला आपल्या पत्नी आणि मुलांच्या चरितार्थाची चिंता सतावत होती. त्यासाठी तुरुंगात जाण्यापूर्वी त्याने आपली जमीन गहाण ठेऊन कुटुंबासाठी पैशांची सोय केली होती. मुलांचं शिक्षण आणि घरचं रेशन यांची सोय व्हावी, हा विचार करून त्याने हा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे तुरुंगातील मेहनतीची कामं करून तो पैसे कमावत असे आणि जेलमध्ये भेटायला येणाऱ्या कुटुंबीयांना देत असे.

हे वाचा-चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या मुलावर हल्ला, धारदार शस्त्राने मुंबईकर तरुणाला केल ठार

मेहुणीने कुटुंबात दरी निर्माण केल्याचा संशय

या दरम्यान, पत्नीने मूळ घर सोडून तिच्या बहिणीच्या घराजवळ राहायला जाण्याचा निर्णय घेतला. पत्नी आणि मुलं नातेवाईकांच्या शेजारी राहायला गेल्याचं समाधान आरोपीला वाटत होतं. मात्र काही दिवसांतच आरोपीला पत्नी आणि मुलं फटकून वागत असल्याचं लक्षात आलं. पत्नीनं त्याला जेलमध्ये भेटायला येणं कमी केलं होतं. त्याचप्रमाणं जेव्हा तो तुरुंगातून शिक्षा संपवून घरी आला, तेव्हा त्याच्या पत्नी आणि मुलांनी त्याला घरात घेण्यासच नकार दिला. तेव्हापासून घराबाहेर भटकत राहणाऱ्या आरोपीला त्याच्या मेहुणीवर संशय आला. मेहणीनेच कान भरल्यामुळे पत्नी आणि मुलं आपल्याला दुरावल्याचा संशय त्याच्या मनात निर्माण झाला. याच संशयातून त्याने मेहुणीची हत्या केली.

अशी केली हत्या

मेहुणीची मुलं आणि पती घराबाहेर गेल्याचा फायदा घेत तो घरात घुसला आणि कुऱ्हाडीचे वार करून मेहुणीचा जीव घेतला. पोलिसांनी संशयावरून आरोपीला शोधून काढलं. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Chattisgarh, Crime, Murder