पुणे, 9 डिसेंबर : सँडविच, कच्ची दाबेली हे प्रकार आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या दोन्हीचे बेस्ट कॉम्बिनेशन असलेला शेवपाव हा पदार्थ पुण्यात मिळतो. या पदार्थाबद्दल सर्वांना माहिती नाही. त्यामुळे हा पदार्थ नेमका काय आहे? तो कुठं बनतो? पुणे शहरातला सर्वात फेमस शेवपाव कुठं मिळतो, याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पुणे-सातारा रोडवर असलेल्या सिटी प्राईट थेटर शेजारच्या गल्लीमधील मार्केट सँडविचमध्ये हा फेमस शेवपाव मिळतो. त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी इथं सँडविच आणि शेवपाव हे पदार्थ विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर लवकरच शेवपावला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या शेवपाव खाण्यासाठी लांबून ग्राहक येतात. दिवसभरात आम्ही साधारण 500 शेवपाव विकतो, अशी माहिती मार्केट सँडविचच्या सौरभ सावंत यांनी दिली. भेळ खाण्यासाठी लागतात रांगा, अधिकारी वर्गाच्या दुप्पट होते कमाई, Video कसा तयार करतात शेवपाव? शेवपाव हा प्रकार कच्ची दाबेली आणि सँडविच चा बेस्ट कॉम्बो म्हणून ओळखला जातो. सँडविचमध्ये सहसा आपण ब्रेडच्या स्लाईस वापरतो. त्याचबरोबर चटणी, कांदा, काकडी, टोमॅटो, चीज, मायोनीज हे सर्व टाकतो. कच्ची दाबेलीमध्ये आपल्या पावांमध्ये कच्चे दाबेलीचा मसाला भरून ती खाल्ली जाते. शेवपावमध्ये या दोन्हींमध्ये वेगवेगळे घटक वापरले जातात. शेवपावमध्ये कच्ची दाबेलीचा पाव वापरला जातो. यामध्ये टोमॅटो, काकडी, चीज, मायोनीज आणि शेवपावची वेगळी चटणी आणि त्यावरती लसणाची लाल शेव ही प्रामुख्यानं वापरली जाते. हातगाडीवर सुरू केला होता व्यवसाय, पॅटीसच्या जोरावर बनले लखपती! Video शेवपामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये तुम्हाला ग्रील शेवपाव, समोसा शेवपाव, चीज शेवपाव आणि साधा शेवपाव हा पर्याय आहे. ‘मी गेल्या काही वर्षांपासून इथे शेवपाव खातो आहे. मला इथला समोसा शेवपाव हा प्रकार आवडतो. त्या सोबतच चीज ग्रील शेवपाव मी आवडीने खातो,’ अशी प्रतिक्रिया येथील नियमित ग्राहक ताज अन्सारी यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.