सातारा, 05 डिसेंबर : आपल्याला थंड वातावरणात वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा होते. लहान असो की मोठे सर्वांना भेळ, पाणीपुरी खायला आवडते. त्यात टेस्टी आणि यम्मी, चटपटीत भेळ कुठे मिळत असेल तर आपण आवर्जून तिथे जातो. सातारा फलटण रस्त्यावर एका दहा फूट जागेत माणसं गर्दी करून, नंबर लावून आवडीने भेळचा आस्वाद घेतात. गेली 23 वर्षापासून नंदू भेळ फेमस आहे.
भेळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. ओली आणि सुखी असे भेळचे दोन प्रकार असतात. साताऱ्यातील शाळा महाविद्यालयातील मुलंमुली भेळ व पाणीपुरी खाण्याचं एकच ठिकाण ठरलेलं आहे, ते म्हणजे नंदू भेळ. कुरकुरीत, खमंग भेळ व गोड तिखट पाणी पुरी इथे मिळते. गेली 20 वर्षांपासून येथील भेळ आणि पाणीपुरी फेमस आहे. पूर्वी हात गाडीवर हे भेळ सेंटर होत आता छोट्या जागेत भेळ सेंटर चालत आहे. भेळ सेंटरचे नाव कैलास भेळ असले तरी नागरिक नंदूच भेळ म्हणून ओळखतात.
समोसासोबत राईस आणि झणझणीत तर्री, औरंगाबादची स्पेशल डिश सर्वात भारी!
दिवसाला 400 प्लेटची विक्री
नंदराम पाल यांचे कैलास भेळ सेंटर आहे. नंदुराम यांनी सुरुवातीच्या काळात जवळपास 6 ते 7 वर्षे फिरून भेळ व पाणी पुरी विक्री केली. दिवसभर जवळपास चारशेहून अधिक ग्राहक सेंटरवर भेळ, पाणीपुरीचा आस्वाद घेतात. तर दिवसाला शंभर ते दीडशे पार्सल विकले जातात. येथील भेळपुरीची किंमत 30 रुपये तर पाणीपुरी 25 रुपये अशा दराने विकली जाते.
हातगाडीवर सुरू केला होता व्यवसाय, पॅटीसच्या जोरावर बनले लखपती! Video
दिवसेंदिवस वाढती गर्दी
घरी बनवलेले फरसाण, शेव, पाणीपुरी, कुरकुरीत मुरमुरे, पापडी, चिरलेला कांदा, काकडी, कोथिंबीर, तळलेली हिरवी मिरची, लाल मिरचीचा भुरका, चिंच गूळ चटणी, या सर्वांच्या मिश्रणातून ही चटकदार, चमचमीत, स्वादिष्ट पाणीपुरी व भेळ बनते. येथील भेळ आणि पाणीपुरीला दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. वाढती गर्दी पाहता नंदराम यांंनी आपल्या मुलांना सोबतीला घेतलेले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Local18, Local18 food, Satara